उस्माननगर, माणिक भिसे| हैदराबाद संस्थानातील अन्याय राजवटी विरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेने यशस्वी केला क्रांतिकारकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी इतिहास घडवावा असे प्रतिपादन जिल्हा परिषद केंद्राचे केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांनी प्रतिपादन केले.
येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेत ७४ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर गावातील प्रमुख मार्गाने लेझीमच्या निनादात व घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर सम्राट अशोक प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आजादी का स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेत चित्रकला, रांगोळी,प्रश्नमंजुषा, सामान्य ज्ञान,अदी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष देवरावजी सोनसळे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.सभापती प्रतिनिधी तथा माजी प.स.सदस्य व्यंकटराव पाटील घोरबांड, केंद्रप्रमुख जयवंतराव काळे, उपसरपंच बाशीद शेख सदर, अशोक काळम पाटील,आमिनशा फकीर,अंगुलिकुमार सोनसळे, संजय वारकड, पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, यांची उपस्थिती होती. सर्व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्व प्रमुख पाहुणे यांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना श्री.काळे म्हणाले की, त्यावेळी संस्थानात निजामाचे राज्य होते. त्यांचे स्वतंत्रपणे सैन्य होते व चलनही वेगळे होते. मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी हुतात्मा गोविंद पानसरे, स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ अशा विविध क्रांतिकारकांचे योगदान होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलीस अॅक्शन करून हैदराबाद मुक्तिसंग्राम यशस्वी केले. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटी विरुद्धचा लढा मराठवाड्यातील जनतेने यशस्वी केला. विद्यार्थ्यीनी क्रांतिकारकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतिहास घडवावा असे श्री काळे यांनी प्रतिपादन केले. यावेळी शेख बाशीद , गणेश लोखंडे,अंगुलिकुमार सोनसळे , देवराव सोनसळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात सम्राट अशोक प्राथमिक शाळेत अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते शालेय साहित्य व गोल्ड मेडल,ट्राॅपी ,हार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे सहशिक्षिक देविदास डांगे यांनी केले तर सुत्रसंचलन नितिन लाटकर यांनी व आभारप्रदर्शन मन्मथ केसे यांनी केले.भगवान राक्षसमारे शकील शेख,श्रीमती समता सोनसळे ,श्रीमती सोनसळे यांच्या सह सहशिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.