सुभाष शुगरच्या आंदोलनाला पाठींबा
नांदेड| भाऊराव युनिट क्रमांक ४ च्या शेतकर्यांचे हंगाम 2016-17 मधील प्रतिटन 615 रुपये बाकी आहेत भाऊराव प्रशासनाने शेतकर्यांचे दहा कोटी रुपये थकीत असताना कारखाना विक्री केला त्यावेळी आमदार माधवराव जवळगावकर हे गप्प राहिले आतातरी भाऊराव कारखाना प्रशासनाला जाब विचारून सभागृहात आवाज उठवतील का असा सवाल ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी हदगाव येथे पत्रकार परिषदेत केला.
सुभाष शुगर हदगाव येथील साखर कारखान्यांसमोर गंगाधर कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे या आंदोलनात सर्वपक्षीय शेतकऱ्यांचा सहभाग आहे. अनेक पक्ष्यांच्या आजी माजी आमदार व पुढाऱ्यांनीही या आंदोलनाला भेटी देऊन पाठींबा जाहीर केला. सुभाष कारखान्याकडे असलेल्या थकबाकीसाठी माधवराव जवळगावकर यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन कारखाना कारखाना प्रशासनाला इशारा दिला होता . परंतु हुतात्मा कारखाना माजी मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आधिपत्याखालील भाऊराव प्रशासनाकडे असतांना त्यांनी कधीही आंदोलनाला पाठींबा दिला नाही शेतकऱ्यांचे दहा कोटी बाकी ठेवून अशोकराव चव्हाण यांनी भाऊराव युनिट क्रमांक चार हा विक्री केला.
त्यावेळीही आमदार जवळगावकर हे गप्प का बसले असा संतप्त सवाल इंगोले यांनी उपस्थित केला. उशिरा का होईना शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांना मागील पैशाची आठवण करून देत श्री इंगोले यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकर्यांचे गाळप हंगाम 2016-17 मधील भाऊराव चे तत्कालिन युनिट क्रमांक चार प्रतिटन 615 रुपये ,युनिट क्रमांक एक 394 ,युनिट क्रमांक दोन 570 इतकी शेतकर्यांची आर एस एफ ची रक्कम अद्याप शिल्लक असल्याचे पुरावे देत या पैशाच्या संदर्भात माजी आमदार खासदार विद्यमान आमदार यांनी शेतकर्यांना पैसे मिळे पर्यंत पाठपुरावा करावा.
अन्यथा त्यांनी आंदोलनाला दिलेला पाठिंबा हा केवळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिल्या सारखे होईल असा आरोप शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी हदगाव येथे शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी शिवसेनेचे नेते बाबुराव कदम कोहळीकर,माजी नगरसेवक गोपाल सारडा,माजी सभापती विवेक देशमुख ,माजी सभापती बाळासाहेब कदम माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी लांडगे पंजाब पाटील हाडसणीकर बबन कदम उपस्थित होते.