नांदेड| आंबेडकर कुटुंबीयांच्या सोबत एकनिष्ठ असलेले आणि आंबेडकर चळवळीतील प्रमुख कुटुंब असलेले माजी आमदार एम डी नेरलीकर यांचे चिरंजीव रिपब्लिकन सेनेचे प्रदेश कार्यकारणी सदस्य कालवश आनंदराव माधवराव नेरलीकर यांचे मागील आठवढ्यात निधन झाले . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकर यांनी पूर्णा( ता पूर्णा जं) येथे नेरलीकर कुटुंबीयांचे बुधवार ( ता.२८ सप्टेंबर ) सांत्वन केले. त्यांच्या कुटुंबाला धीर दिला.त्यांना आश्वसित केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात असलेले प्रमुख कार्यकर्ते माजी आ माधवराव नेरलीकर हे मराठवाड्यातील शेड्युल कास्टचे पाहिले आमदार होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा त्यांना सहवासात लाभला. बाबासाहेबांच्या पावन स्पर्शाने नेरलीकर कुटुंब धन्य झाले .भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मीराताई आंबेडकर, ऍड बाळासाहेब आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव भैयासाहेब आंबेडकर यासर्वाच्या सोबत आनंदराव नेरलीकर यांनी काम केले आहे. त्याच्याशी आनंदराव यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते
मागील आठवड्यात रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सदस्य आनंदराव नेरलीकर यांचे निधन झाले त्याच्या अभिवादन सभेसाठी सचखंड एक्स्प्रेस ने दुपारी दीड वाजता आनंदराज आंबेडकर यांचे पूर्णा येथे आगमन झाले त्यानंतर त्यांनी कालवश आनंदराव नेरलीकर यांच्या निवासस्थानी भेट दिली त्याच्या प्रतिमेस अभिवादन केले तसेच त्याच्या मातोश्री द्रौपदाबाई नेरलीकर, थोरले बंधू, गौतम नेरलीकर, पत्नी रेखा नेरलीकर , चिरंजीव न्या भूषण नेरलीकर, भाऊ ऍड मिलिंद , भाऊ सरकारी वकील ऍड महेंद्र , मुलगी स्नेहजा जावई महेंद्रकुमार भालेराव व कुटुंबियांचे श्री आंबेडकर यांनी सांत्वन केले.
त्यांना धीर दिला.आंबेडकरी चळवळीतील व रिपब्लिकन सेना आपल्या सोबत आहे .कधीही काही अडचण असेल तर सांगा या आमचे कुटुंब सोबत आहे. या शब्दात आनंदराज आंबेडकर यांनी नेरलीकर कुटुंबियांना धीर दिला सांत्वन केले. त्यानंतर कम्युनिटी हॉल येथे कालवश नेरलीकर याना श्रद्धांजली शोक सभा आयोजित करण्यात आली होती तेथे आनंदराज आंबेडकर व मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी रिपब्लिकन सेनेचे ज्येष्ठ विजय वाकोडे, राष्ट्रीय महासचिव संजीव बोधनकर, संघटक भैयासाहेब भालेराव,राज्य सचिव श्रीपती ढोले, मराठवाडा अध्यक्ष माधव जमदाडे, सुनील सावळे, सुनील धुतमल, हरिहर धुतमल, प्रमोद धुतमल, यासह नातेवाईक कार्यकर्ते उपस्थित होते.