खंडणी मागणीचे पत्र आल्याचं सांगून, मीडिया समोर पत्र ठेवल्याने ते सुद्दा असुरक्षित असल्याचे समोर आले आहे.
खा चिखलीकर यांना आलेल्या निनावी पत्रातून दहा कोटीची खंडणी मागितली होती, आठ दिवसांत खंडणी दिली नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट चिखलीकर यांनी केला आहे. या संदर्भात रिंदाच्या नावाने आलेलं पत्रही चिखलीकर यांनी माध्यमांना दिले आहे. बियाणींच्या हत्येनंतर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थे बाबत स्वतः पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वारंवार चिंता व्यक्त केली. अशातच खंडणीसाठी व्यापाऱ्यांना धमक्या येण्याचे प्रमाण ही वाढले आहे. मात्र अगोदरच भयभीत असलेल्या व्यापार्यांना भीती निर्माण होऊ नये म्हणून मी ही माहिती उजागर केली नाही.
मिळणाऱ्या खंडणीसाठीच्या धमक्यांमुळे सध्या नांदेड जिल्ह्यात दहशतीच वातावरण आहे. खासदार चिखलीकर यांनी आपल्या सात महिण्यापुर्वी आलेल्या धमकीच्या पत्राची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, स्थानिक राजकीय नेत्याच्या दबावामुळे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप चिखलीकर यांनी केला आहे. आपण त्यावेळी या पत्राची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, आपण आता धमकीचे पत्र सार्वजनिक करत आहोत आणि या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी पुन्हा निवेदनाद्वारे करत असल्याचे चिखलीकर यांनी माध्यमातून स्पष्ट केले.
दरम्यान, खासदारांना गुंडाचे खंडणी आणि जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र येत असेल तर नांदेड मध्ये सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहे का...? असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. आता खासदार चिखलीकर यांच्या मागणीवरून पोलीस काय पाऊले उचलतील चिखलीकर यांच्या मागणीनुसार बियाणी हत्याकांड तपास सीबीआयला सोपावतील का याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.