किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांनी ई - केवायसी करून घ्यावी - तहसीलदार काशीनाथ पाटील -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
तालुक्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पीएम किसान पोर्टलवर एकुन ५६७७५ नोंदणीकृत लाभार्थी असुन त्यापैकी ४३,६१६ लाभधारकानी ई - केवायशी केली असुन १३१५ ९ लाभार्थ्यांनी अदयापही ई - केवायशी केलेली नसल्याचे असे दिसुन येते . तरी मुखेड तालुक्यातील पीएम किसान योजनेच्या लाभधारकाने अदयापही केवायसी केलेली नाही. अश्या शेतकऱ्यांनी दि‌. ८ सप्टेंबर २०२२ पर्यंत पात्र लाभार्थ्यांनी ई - केवायसी करून घ्यावी - तहसीलदार काशीनाथ पाटील यांनि केले आहे.

अशा लाभधारक शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे ई - केवायसी करावी पीएम किसान https://pmkisan.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन Farmer Corner या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान ॲपवर ओटिपी व्दारे लाभार्थींना स्वतः ई - केवायशी प्रमाणीकरण करता येईल. त्याचप्रमाणे ग्राहक सेतु सेवा केंद्र ,केंद्र शासनाच्या ग्राहक सेवा केंद्रावर बायोमॅट्रीक पध्दतीने ई - केवायशी प्रमाणीकरण करता येईल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वरील प्रमाणे सर्व पात्र लाभार्थ्यानी ई - केवायसी प्रमाणीकरणची प्रकीया बंधनकारक करण्यात आली असुन सदरिल ई- केवायसी दि.०८ सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. अन्यथा या पुढील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार नाही याची सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन मुखेड चे तहसीलदार काशीनाथ पाटील यांनी तालुक्याती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांना केले आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी