पिंपळकुंठा ग्रा.पं.निवडणुकीसाठी पांडुरंग पा. गोपनर गटांने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केले दाखल -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
मुखेड तालुक्यातील मौजे पिंपळकुठा येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी  चालू आहे. या सार्वत्रिक निवडुकीसाठी मा.सरपंच पांडुरंग पा.गोपनर यांच्या जय मल्हार ग्रामविकास पॅनल पिंपळकुठा च्या वत्तीने आज मुखेड शहरात सिनेस्टाईल स्वरूपात भव्य रँली काढून ढोल ताशांच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.


यामध्ये लोकनियुक्त सरपंच पदासाठी सौ.रेखाताई पांडुरंग गोपनर यांचा तर ग्रा.प.सदस्य पदाच्या निवडीसाठी सुलोचनाबाई व्यंकट गोपनर,बालाजी गोपनर,संभाजी श्रिरामे, कमळबाई गुबनर,शंकर पवार, अचित जांभळे,शाहूबाई शिवाजी जाधव,शंकर चंदू पवार,स्वाती नालापल्ले,पार्वतीबाई वाघमारे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी जय मल्हार ग्रामविकास पॅनेलचे कार्यकर्ते व गावातील मतदार बांधवासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी