हिमायतनगर। शहरासह तालुक्यातील प्रत्येक मतदार नागरीकांनी निवडणूक ओळखपत्राला आपले आधार जोडून घेणे अनिवार्य असल्याने शहरातील दारलुम मोहमदिया चौपाटी येथे आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक सेठ व सामाजिक कार्यकर्ते एस.डी.अमेर यांनी मतदान कार्डला आधार लिंक करण्याचे शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिराचे उद्घाटन तहसीलचे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार एस.व्ही.ताडेवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शहरातील चौपाटी परिसरातील नागरिकांसाठी मतदान कार्डला आधार लिंक करण्याचे शिबीर दि 16 सप्टेंबर रोजी आयोजित केले होते त्याला शहरातील अनेक नागरिकांनी भर भरून प्रतिसाद देत या शिबिरात 842 नागरिकांनी मतदार कार्ड ला आपले आधार जोडून घेतले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शेख रफीक सेट,सामाजिक कार्यकर्ते एस डी आमेर, प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल, फरोज खुरेशी ,जकरिया मौलाना सोहेल खान मुदस्सिर खान शेख मजार उबेद खान शेख जुबेर अतीक भाई पोठेकर अबू तालिब शेवालकर सह आदी जन यावेळी उपस्थित होते