उस्माननगर,माणिक भिसे। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.आ. अशोकराव चव्हाण यांचे उस्माननगर येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
दि.१६ सप्टेंबर शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण ,मा.आ.अमरनाथ राजूरकर यांच्या सह अनेक नेते मंडळी कंधार पंचायत समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कै.माधवराव गोविंदराव पाटील पांडागळे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समधी स्थाळकडे अभिवादन करण्यासाठी जात असताना उस्माननगर येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यानी जंगी स्वागत केले.
यावेळी देवरावजी सोनसळे, व्यंकटराव पाटील घोरबांड, आमिनशा फकीर,जावेद मौलाना,मुखीद मौलाना,अशोक पाटील काळम, गंगाधर भिसे,सौ.संगीता विजय भिसे ( ग्रा.प.सदस्या ) राहुल सोनसळे, शिवाजी भिसे,बाळू सोनटक्के,व्यंकट सोनटक्के, दत्ता पाटील घोरबांड, गोविंद भिसे, तुकाराम भिसे,शादुल शेख, यांच्यासह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.