स्व.रामभाऊ चनावार पुण्यस्मरण स्पर्धा परिक्षार्थ्यांना अभ्यासपूरक साहित्य देऊन मित्रांचे अभिवादन -NNL


लोहा| शिवसेनेचे ज्येष्ठ स्व रामभाऊ चनावार हे अजातशत्रू होते.गरिबीतून कष्टाने पुढे आले.त्यांचा जीवन जगण्याचा मंत्र अनेकांच्या जीवनात नंदादीप ठरला .असा अनेक आठवणींना उजाळा देत त्याच्या जिज्ञासा अभ्यासिकेतील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास पूरक साहित्य देऊन  मित्र परिवाराने द्वितीय पुण्यस्मरण (२ सप्टेंबर ) निमित्ताने अभिवादन केले 

जिल्ह्यातील शिवसेनेचे  जेष्ठ  स्व रामभाऊ चनावर यांच्य कोरोना काळात निधन झाले त्याच्या जाण्याने मित्र परिवारात राजकीय सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली. संवाद आणि संभाषणात  सर्व पक्षीय मित्रांना खिळवून ठेवण्यात त्यांचा हातखंडा होता. 

जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात  अभिवादन स्व रामभाऊ चनावर   यांचा २ सप्टेंबर पुण्यस्मरण दिवसा निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले.स्व रामाभाऊ यांचे मित्र सेवानिवृत्त कृषी अधिकारी माणिकराव मुकदम , माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम ,प्रा डॉ धनंजय पवार,  आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेललवार,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव कटकमवार ,  शिक्षक  संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ चव्हाण,  व्यापारी संघटनेचे बाळू सावकार पालिमकर, माजी उपसभापती मारुती पाटील बोरगावकर, संजय मक्तेदार, दीपक रुद्रवार, संचालक हरिहर धुतमल,  गिरीश चनावर पत्रकार विलास सावळे , विनोद महाबळे, व्यवस्थापक बालाजी धनसडे यांची प्रमुख उपस्थिती होती

प्रा डॉ डी एम पवार यांनी रामभाऊच्या जीवनातील  प्रसंग  सांगताना त्यांनी मित्रत्वाच्या आठवणींना उजाळा दिला असा दिलदार मित्र आता होणे नाही. या शब्दात अभिवादन केले तर सेवानिवृत्त कृषी अधिकारी माणिकराव मुकदम यांनी आठवणीला उजाळा दिला.प्रास्ताविक हरिहर धुतमल यांनी केले. स्व.रामभाऊचे मित्र परिवार यांनी जिज्ञासा अभ्यासिकेतील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास पूरक साहित्य, वृत्तपत्र देऊन या मित्रांनी रामभाऊंना अभिवादन केले.गिरीश चनावर यांच्या पुढाकाराने रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. उपनगराध्यक्ष दता वाले, आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेललवार व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी