मृतांमध्ये 4 बिहारी कामगारांसह ट्रक चालकाचा समावेश
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि.२४ च्या सायंकाळी हिमायतनगर भागात रेल्वे इलेकट्रीक लाईनचे काम करून हे सर्व बिहार मजूर हिमायतनगरहून - भोकर येथे कामासाठी ८ मजूर जात होते. सायंकाळी ते बसून जात असलेल्या आयचार वाहन क्रमांक एम एच २६ जे ००१६ ला भरधाव वेगातील भोकर कडून येणाऱ्या सिमेंटच्या ट्रक क्रमांक एम एच २६ बीई १०११ ने येथील वेयर हाऊसच्या नजीक जबर धडक दिली. या वाहनातील ५ जन जागीच ठार झाले. तर यातील जखमींना सोनारी येथील युवकांनी बाहेर काढून सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. जखमींपैकी एक मजूर अरविंद शिवाजी बनसोडे हिमायतनगर येथील असून, शेख शेहजानं, अल्लामीन मोमीन, अबू ताहीर, शफिकूल मोमीन हे सर्व रा.मालदा वेस्ट बेंगॉल येथील मजूर आहेत. या सर्वावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमीक उपचार करून नांदेडला रेफर केले आहे.
मयतामध्ये शे.रफिकुल शे.शमशेरोद्दीन, वय २५ वर्ष, रा मालदा, पश्चिम बंगाल, मोहम्मद नबिरुद्दीन मोहम्मद खामीरुद्दीन, वय २७ वर्ष रा.मालदा, पश्चिम बंगाल, भीक्कन मोमिन लतीफ मोमीन, वय १९ वर्ष, रा मालदा, पश्चिम बंगाल, प्रकाश मारोती गिमेकर, वय ४५ रा.फुलेनगर, हिमायतनगर (ट्रकचालक), साईनाथ बाबाराव पांचाळ वय ४३ रा.रेणापूर, ता.भोकर यांचा समावेश आहे. एकूणच अपघाताचा हा शनिवार त्यांच्यासाठी घातवार ठरला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच रात्रीला अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तर मृतांच्या डेडबॉडी ताब्यात घेण्यासाठी आणि जखमींना रुग्णालयात दखल करण्यासाठी तातडीने ऍम्ब्युलन्स दाखल झाली होती.
यापूर्वीही झाले या रस्त्यावर अनेक अपघात
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहनांना वेग मर्यादा नसल्याने भरधाव वेगात वाहने चालविली जातात. दोन दिवसापूर्वी भरधाव व्हॅनच्या धडकेत १ काळवीट जागीच ठार झाले होते. वर्षभरापूर्वी सोनारी फाटा जवळ झालेल्या कार अपघातात १ जण ठार झाला होता. गतवर्षी पोटा जवळ कार अपघातात १ जण दगावला, रंगपचमी दिनी खडकी फाट्याजवळ झालेल्या अपघातात ऐकाच मृत्यू झाला. तसेच वर्षपूर्वी खडकी फाट्यावर झालेल्या दुचाकी अपघातात वाळकेवाडी येथील ३ जणांचा मृत्यू झाला या सर्व घटना पाहता हिमायतनगर - भोकर - किनवट हा राष्ट्रीय महामार्ग अपघाताला कारणीभूत ठरला आहे. राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर, वाहनांना वेग मर्यादा लावणे आणि मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी करणे गरजेचे असल्याचे मत आजच्या अपघातानंतर अनेकजण वक्त करत आहेत.