नवीन नांदेड। श्री भगवान बालाजी मंदिर संभाजी चौक एल,आय,सी कार्यालय सिडको येथील 32 वा दसरा ब्रह्मोत्सवानिमित्त 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर दरम्यान दैनंदिन होम हवन विधी अभिषेक, कलशाभिषेक , वसंत उत्सव, कल्याण उत्सव आदी कार्यक्रमासह रथयात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून जय्यत तयारी करण्यात येत आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री भगवान बालाजीचा ब्रह्मोत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला असून 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर दरम्यान आचार्य पंडित वटीकोटा रामानुजाचार्य स्वामी, राममंदिर सिकंदराबाद व मंदिर पुजारी श्री दिव्यांशु महाराज यांच्या आचार्य तत्वाने सकाळी अभिषेक, नामपाठ, होम हवन विधीपूर्वक संपन्न होणार आहे. दररोज वाहनातून श्री भगवान बालाजी उत्सव मूर्तीची मिरवणूक सकाळी व सायंकाळी निघणार आहे. सोमवारी दि 4 ऑक्टोंबर रोजी भगवान बालाजी उत्सव मुर्तीची भव्य मिरवणूक संध्याकाळी 7 वाजता रथ वाहनातून काढण्यात येणार आहे.
विजयादशमी दसरा निमित्त 5 ऑक्टोंबर रोजी अभिषेकानंतर भक्तांना भगवान बालाजीचे दर्शन देण्यात येणार आहे. या ब्रम्होत्सव सोहळ्यात जास्तीत जास्त भाविक भक्तांनी सहभागी व्हावे व आजीव सभासद सेवा नोंदणी २१००रुपये ठेवण्यात आली असून मंदिराच्या विकासासाठी भाविक भक्तांनी सडळ हाताने मदत करण्याचे व दसरा ब्रह्मोत्सवा निमित्य आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष साहेबराव जाधव , कोषाध्यक्ष बाबूराव बिराजदार, सचिव व्यंकटराव हाडोळे, डॉ.नरेश रायेवार, आनंद बासटवार,वैजनाथ मोरलवार, रामचंद्र कोटलवार,पुरुषोत्तम लाठकर, गोविंद सुंनकेवार, पुंडलिक बिरादार व उत्सव समिती भगवान बालाजी मंदिर संस्थान यांनी केले आहे.