गावागावातील लोकप्रतिनिधि व प्रशासनावर शेतकर्यांनी दबाव वाढवावा बालाजी ढोसणे यांचे शेतकर्यांना आवाहन
मुखेड, रणजित जामखेडकर। प्रतिनिधी सततच्या पावसाने व सलगच्या ऊघडीप मुळे पिकांचे नुकसान झाल्याने जिल्हाधिकारी नांदेड यांनी 25 आगाऊ रक्कम देण्या संदर्भात युनायटेड इंडीया इन्सुरन्स कंपनीला दिले होते पण ते आदेश नाकारल्याची चर्चा तालुक्यात पसरल्याने शेतकर्यात संतापाचे वातावरण होते. गेल्या वर्षी पण जिल्हाधिकारी यांनी 25 टक्के पिक विमा लागुचे आदेश काढले होते जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रेसनोट पण दिली होती पण ऐनवेळी शेतकर्यांना 18 टक्के रक्कम घेवुन समाधान मानावे लागले घोडे कुठे पाणी पिले की हे समजेना झाल्याने गेल्यावर्षीची वेळ यावर्षीही येवु नये म्हणुन शेतकरी बांधव दक्ष झाले आहेत.
आगाऊ रक्कम रद्द झाल्याची चर्चा होत असुन प्रशासनाने सत्य समोर आणावे व 25 टक्के पेक्षा जास्तीच्या पुर्वसुचना दाखल झाले असतील तर तात्काळ संयुक्त समितीचा पंचनामा घेवुन विमा कंपनीच्या कर्मचार्याकडुन होणारी लुट हेळसांड मनस्ताप थांबवावा अशी मागणी शिवसेनेचे बालाजी पाटील ढोसणे यांनी तालुका कृषि अधिकारी विकास नारनाळीकर यांची शेकडो शेतकर्यासमवेत भेट घेवुन केली. जर विमा मंजुर नाही झाला तर विमा कार्यालय शेतकर्यांच्या रोषासमोर राहणार नाहीत असा गर्भीत इशारा ढोसणे यांनी दिला.
यंदा झालेला सततचा पाऊस,सलगची ऊघडीप,अतिवृष्टी, पूर यामुळे पिकांचे नुकसान पाहता जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीला २५ टक्के रक्कम आगाऊ देण्याचे निर्देश दिले होते. पण तेच अमान्य करीत कंपनीने अपील दाखल केल्याची चर्चा असल्याने आता दसरा-दिवाळीत अपेक्षित असणारी संभाव्य मदत लटकल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे शेतकर्यांची दसरा दिवाळी अंधारमय करणार्या कंपनीचा सरकारचा शेतकरी तिव्र संताप व्यक्त करीत आहेत.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ खुलासा करावा खरे खोटे शेतकर्यासमोर आणण्याचे आवाहन शिवसेनेचे बालाजी पाटील ढोसणे यांनी केले आहे.यावेळी निळकंठ पाटील बेळीकर,गफार शेख,व्यकंट ताटे, गंगाधर कोडांमगले,लक्ष्मण गोजेगावे,मनोहर सकवारे, अब्दुलरहीम शेख,शरीफाबी शेख,जिलानी शेख,सुधाकर गोजेगावै,श्रिराम सकवारे,बालाजी ताटे,शोभाबाई ताटे,राम वडले,यासह शेकडो शेतकरी ऊपस्थितीत होते.