26 सप्टेंबरची नांदेड-संतरागच्ची-नांदेड एक्सप्रेसची एक फेरी रद्द
नांदेड| उद्या दिनांक 22 सप्टेंबर, 2022 रोजी आदिलाबाद-नांदेड-आदिलाबाद इंटर सिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे, ती पुढील प्रमाणे–
१) दिनांक 22 सप्टेंबर 2022 ला आदिलाबाद येथून सुटणारी गाडी संख्या 17409 आदिलाबाद ते नांदेड इंटर सिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. २) दिनांक 22 सप्टेंबर 2022 ला नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 17410 नांदेड ते आदिलाबाद इंटर सिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
तसेच नांदेड-संतरागच्ची-नांदेड एक्सप्रेस ची एक फेरी रद्द करण्यात आली आहे, टी पुढील प्रमाणे 1) दिनांक 26 सप्टेंबर 2022 ला नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 12767 नांदेड ते संतरागच्ची साप्ताहिक एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. 2) दिनांक 28 सप्टेंबर 2022 ला संतरागच्ची येथून सुटणारी गाडी संख्या 12768 संतरागच्ची ते नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.