शाळेला सरस्वती मातेची सुंदर मूर्ती भेट.
उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर ( मोठी लाठी) ता.कंधार येथील समता विद्यालयातील १९९८ या वर्षी इयत्ता दहावीत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने शनिवारी दि. ६ रोजी सर्व वर्ग मित्रांना चोवीस वर्षांनंतर समता विद्यालयाच्या प्रांगणात एकत्रित करणारा " स्नेह मेळावा " उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयातील प्रांगणात सहा ऑगस्टला हृदयस्पर्शी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक, आदरणीय श्याम सुंदर जहागीरदार गुरुजी होते .तर प्रमुख उपस्थितीत मुकुंदराव गुरुजी, तु. शं. वारकड, माजी विद्यार्थी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, शेख खय्युम, समता विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद बोदमवाड, पर्यवेक्षक राजीवअंबेकर, संस्थेचे अध्यक्ष देशपांडे, अनिरूद्ध सिरसाळकर, प्रदीप देशमुख, पत्रकार, समता च्या संचालकांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेतील २०२२ मध्ये दहावी व बारावी परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणारे दिक्षा माधव वारकड, सुमती नरेश शिंदे, सोमनाथ पाटील, नरेश काळम, कोमल घोरबांड, शुभांगी भरकडे, श्रेया साखरे, ओमकार कळसकर, दहावी मधिल प्रणवी सुरेवाड, दिव्या घोरबांड, पल्लवी वर्ताळे, सानिका रविराज लोखंडे या विद्यार्थ्यांसह शिक्षक,शिक्षिकांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार ,पुस्तक भेट देवून गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विश्वंभर पल्लेवाड यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले " १९९८ दहावी क्लासमेट " व्हाट्सअप ग्रुप माध्यमातून आम्ही सर्व वर्गमित्र परस्परांशी जोडलेले होतो. आपण एकदा तरी सर्वजण एकत्रित येऊन भेटुया. आत्मियता, मायाळू पणाचा अनुभव घेतलेल्या आपल्या शाळेत एकत्रित येण्याचा आनंद मिळत आहे . शाळेत शिक्षकांनी आम्हाला भरभरून दिले. रविवारी मैत्री दिन साजरा होतो आहे. या माध्यमातून परस्परांशी हितगुज व्हावे, कौतुक करावे, जेणेकरून सर्वांना सकारात्मक उर्जा मिळावी यासाठी या स्नेहसंमेलन घेण्या मागील उद्देश असल्याचे सांगितले.
जावेद हरबळकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना " शाळेत सी बी एस सी अभ्यासक्रम सुरू करावा. गावातील विवेकानंद वसतिगृह पुन्हा सुरू करण्यात यावे. क्राॅप सायन्स हा विषय घेण्यात यावा. दहावी व बारावी साठी दिपावली नंतर सराव परिक्षा वाढीव घ्याव्यात. शाळेतील कार्यक्रमासाठी सांस्कृतिक सभागृहाची उभारणी केली जावी. अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शेख खय्युम, डॉ. खलिल, श्री. वारकड, यांनी मनोगत व्यक्त केले. शाहूराज काळम यांनी " जाने कहा गये वो दिन " गीत गाऊन वर्गमित्रांना व उपस्थितीतांना प्रफूलित यावेळी केले.१९९८ ग्रुपच्या वतीने शाळेला सरस्वती ची तांब्याची मूर्ती भेट म्हणून दिली.
अध्यक्षीय समारोप करताना शा.शं. जहागीरदार गुरुजी म्हणाले की , विद्यार्थ्यांच्या या मन जिंकून घेणारा उपक्रम असल्याचे सांगून कौतुक केले. शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी पुन्हा परत येतील असे वाटत होते.पण माजी विद्यार्थी यांनी ति शंका दूर केली आहे.व्यवसायिक जीवनात जगताना प्रत्येकांना अनंत अडचणी येत असतात.तुम्ही त्या अडचणी वर मात करून शाळेचे नाव उंचावले आहे.अलंकार घडविण्याचे काम तुम्ही करत आहात याचा सार्थ अभिमान आहे.असे मत व्यक्त केले. यावेळी यशस्वीपणे उपक्रमाचे आयोजन केलेल्या १९९८ ग्रुपचे व सय्यद जाफर व संभाजी चिवटे यांचे मुख्याध्यापक गोविंद बोदमवाड यांनी विशेष अभिनंदन करुन शाळेच्या वतीने उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देवून यथोचित सन्मान केला.
या स्नेहसंमेलन सोहळ्यासाठी डॉ. संदीप मेहकरकर,विलास कासलीवाल, शिवदास डांगे, बालाजी क्षीरसागर, माधव कदम, दत्ता घोरबांड, उमाकांत वारकड, रामदास दांगट, असद पठाण, बसवेश्वर वारकड, विजय परसराम भिसे, मन्मथ डांगे, एजाज शेख, बसवेश्वर साखरे, शंकर हामदे, रोहिदास सुक्रे, देवराव डांगे, विलास खेडकर, संजय हराळे, शेख साजिद, प्रविण शिंदे, गौस पठाण, रामचंद्र घोरबांड, जिल्हावार, गुणाजी भिसे, मिना लक्ष्मण मोरे, दैवशाला टिमकेकर, शेवंता काळम, यांची उपस्थिती होती. या स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.