नांदेड| स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १७ ऑगस्ट रोजी सकाळी ठिक ११ वाजता ॲक्सिस बँक कलामंदिर नांदेड समोरील मुख्य रस्त्यावर धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर, बिरबल यादव यांच्या संयोजनाखाली समूह राष्ट्रगीत गायन घेण्यात आले त्यावेळी रस्त्यावरील सर्व नागरिकांनी स्तब्ध उभे राहून तिरंग्याला मानवंदना दिली.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या निर्णयानुसार भाजपा महानगर नांदेड, शिवसेना, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा, आर्य चाणक्य सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. वाहनावर ध्वनिक्षेपकावर राष्ट्रगीत वाजवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
सुरुवातीला संयोजक दिलीप ठाकूर यांनी हा उपक्रम घेण्यामागची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरबल यादव यांनी तर श्रीकांत पाठक यांनी आभार मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश यादव, संतोष भारती, अभिजीत पाटील, शशीमोहन नंदा, कैलास बरंडवाल, अमोल देवके, गजानन भगत, ऋषिकेश चौधरी, बालाजी अडकुलवार, गणेश बिरकुले ,हरीओम अनंतवार ,दिगंबर रूमणे, माधव पाटील यांनी परिश्रम घेतले.