मुखेड, रणजित जामखेडकर| प्राध्यापकांच्या सेवेतील अनंत अडचणींना वाचा फोडत कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्याय - अत्याचार व न्याय्य मागणीसाठी प्रयत्नशील राहणाऱ्या संघटनेपैकी जुक्टा ही एक कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांची संघटना आहे. या संघटनेला बळकट करण्याकरिता मुखेड तालुकास्तरावर संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जुक्टा संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी प्रा.अनिल गोडणारे तर सचिव म्हणून प्रा.पांडव मुंगनाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
निवड प्रक्रियेत निरिक्षक म्हणून जुक्टा संघटनेचे विभागीय प्रतिनिधी प्रा.शाहुराज गोरे , दूसरे निरिक्षक प्रा.संदीप पाटील बेटमोगरेकर यांनी संवैधानिक मार्गाने अतिशय शांततेच्या वातावरणात सर्वानुमते तालुकाध्यक्ष पदी मुखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विषयाचे प्रा.अनिल गोडणारे , उपाध्यक्ष प्रा.सुनिल कांबळे ,सचिव विद्या विकास उच्च माध्यमिक विद्यालय बारहाळीचे प्रा.पांडव मुंगनाळे , सहसचिव प्रा.रामदास शिंदे , प्रा.संतोष पाटील , कोषाध्यक्ष प्रा.आशुतोष पाटील , तालुका प्रतिनिधी प्रा.लोकस पाटील , तालुका संघटक प्रा. उमाकांत दापकेकर , महिला प्रतिनिधी प्रा.सौ.एन.टी.चवळे यांची निवड करण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बी.यू.गांजरे तर आभार प्रदर्शन प्रा.जी.ए.गाडले यांनी केले .कार्यक्रमाचे आयोजक शाहीर अण्णाभाऊ साठे उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.एस.डी.केरूरे हे होते . यावेळी तालुक्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्रतिनिधी उपस्थित होते .
या निवडीबद्दल वीरभद्र शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी , संचालक मंडळ , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , प्र.प्राचार्य प्रा.सी.बी.साखरे , उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता पाटील बेटमोगरेकर , प्रा.डी.बी.साखरे , स्टाँफ सेक्रेटरी प्रा.डॉ. दिलीप आहेर , प्रा.डॉ. पी.डी.राठोड , प्रा.डॉ. सी.एन.एकलारे , प्रा.जी.एम.वायफणकर , प्रा.प्रा.जी.ए.गाडले , प्रा.एस.जी.स्वामी , प्रा.डी.बी.वडजे , प्रा.बी.यू.गांजरे , प्रा.संतोष कामोले , प्रा.सुनील तमशेट्टे , प्रा.संतोष बिरादार , प्रा.ओमप्रकाश राजारूपे , प्रा.मनोज साखरे , प्रा.रवींद्र सोनुले , प्रा.डॉ.संजय गायकवाड , प्रा.विजय राठोड , प्रा.डॉ. हरीदास भोईवार , उषा वारकड , संजय पोलावार , दै.यशवंतचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवानंद स्वामी , प्रा.संतोष मठदेवरु , प्रा.शंकर पाटील नरंगलकर , प्रा.चिद्रावार इत्यादींनी अभिनंदन करून कौतुक केले .