अर्धापूर| तालुक्यातील लोणी (बु) येथील ३ ट्रान्सफाॅर्मर अनेक महिन्यांपासून बंद असल्याने त्वरीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी लोणीकरांनी गुरुवारी विजवितरणच्या उपविभागीय अधिकारी अविनाश रामगीरवार यांना निवेदन दिले.
तालुक्यातील लोणी ( बु) येथील ३ ट्रान्सर्फमर अनेक महिन्यांपासून बंद आहेत, संबंधित अधीकाऱ्यांनी याकडे सरळ दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे शेतातील पीकांना पाऊस उघडल्याने सिंचन करणे गरजेचे असूनहि विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पीकांना फटका बसत आहे,विद्युत पुरवठ्यावर चालणारे उद्योगही बंद आहेत.कर्मचारी व अधीकारी उडवाउडवीचे उतरे देत असल्याने लोणी ( बु) येथील गावकऱ्यांनी अर्धापूरातील विजवितरणचे कार्यालय गाठले, यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश रामगीरवार यांना अशोक बुटले,विलास कापसे,गंगाधर बुक्केवार, कैलास भुस्से,हनुमान फाटेकर,लखन लासीनकरबन शिंदे,शिवकुमार कापसे,हनुमंत बुटले यांच्या स्वाक्षरीचे निवेदन दिले.