हिमायतनगर| कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून रोजगार प्राप्ती हा दृष्टीकोन समोर ठेऊन मेक इन इंडिया, स्किल इंडिया हे ध्येय पूर्ण करण्यासाठी राज्यातील युवक-युवतींचा ई-लर्निंग सॉफ्टवेयरद्वारे प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास केला जाणार आहे. तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी निर्माण करून दिली जाणार आहे. एकाच छताखाली सर्वच प्रकारच्या विषयाचे प्रशिक्षण मिळणार असून, या प्रशिक्षणच्या माध्यमातून इयत्ता ६ वि ते १२ वि पर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ १० टक्के शुल्कातून संगणकीय आणि प्रोजेक्टरच्या माध्यमातून ज्ञान दिले जाणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना नीट, एमएचटी, सीआयटी, जीईइ एनडीए तयारीसाठी उपयुक्त ठरणार आहे. या संधीचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा मिळावा यासाठी पालकांनी याचा महत्व समजून घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे असे आवाहन काशिनाथ गड्डमवार मार्कंडेय एजुकेशन चे संचालक यांनी केलं आहे.
संगणक युगात विद्यार्थ्यांनी नौकरी/स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा आणि नोकरीच्या संधी हातून जावू नये. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून स्पर्धकाला त्याच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग साधता यावा. म्हणून शासनाने एक वेबसाईट उपलब्ध करून दिली असून, यामध्ये सर्वच प्रकारचे विषय ठेवण्यात आले आहेत. काही इंटरनेट कॅफे अथवा कॉम्पुटर क्लास मधून ऑनलाईन अर्ज भरून दिले जातात. परंतु, चालकास उपलब्ध सर्वच नोकर भरतीची माहिती असतेच असे नाही. त्यामुळे या संधीचा पूर्ण फायदा घेऊ शकत नाही. याशिवाय छापील अर्ज हे प्रामुख्याने शहरातील निवडक पेपर विक्रेत्यांकडे उपलब्ध असतात. बरेचदा या मुद्रित अर्जाचा दर्जा संबधित संस्थेस अपेक्षित गुणवत्तेचा असत नाही. तरीही त्याला पर्याय उपलब्ध नसल्याने अनेक नोकरी इच्छुक उमेदवार तो खरेदी करतात.
सर्व पालकांनी त्यांच्या स्वतःच्या मुलांची तसेच इतरांची नोंदणी केली पाहिजे कारण आपल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हे अतिशय फलदायी आहे. जागरूक पालक या नात्याने त्यांना त्यांच्या आवडीनुसार उपक्रम निवडण्यास मदत करून त्यांना भविष्यातील आयुष्यात उत्कृष्ट बनविण्यात मदत करू. मोठ्या शैक्षणिक संस्थामध्ये व उच्च शिक्षणासाठी अॅडमिशन घेते वेळी लाखो रुपये डोनेशन न भरता त्याला मेरिट वर ऍडमिशन मिळावे म्हणूनच आपल्याला 6 वी ते 12 वी पर्यंत मुलांना भाग घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. यामुळे आपल्या मुलास स्पर्धात्मक मोडमध्ये येण्यासाठी एक सामाजिकदृष्ट्या मदत कार्य करत आहेत.
संभाव्य नोकरी शोधण्यासाठी आपण www.markandeyeducation.com या वेबसाईट चा वापर करू शकता, www.markandeyeducation.com या वेबसाईट चा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी अशा आहे.
वैशिष्ट्य
★ विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची क्षमता वाढते.
★ विद्यार्थ्यांच्या सृजन शिलतेचे आकलन होते.
★ विद्यार्थ्यांना नाविन्य पूर्ण विचार करण्याची प्रेरणा मिळते.
★ विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.
★ विद्यार्थ्यांची योग्यता तसेच एखाद्या विशिष्ठ विषयाच्या ज्ञानाची चाचणी घेऊन त्यांना भविष्यातील स्पर्धा परिक्षे साठी तयार करण्यात येते.
★ पालकांना विद्यार्थ्यांचा कल लक्षात येतो.
★ शाळा स्तरापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागते.
★ इतर मुलांच्या तुलनेत मागे न पडता त्याने पुढे असावे
★ १०/१२ वी बोर्ड परीक्षा व १२ वी नंतरच्या प्रवेश परीक्षा (JEE,NEET,MHT CET व इतर )च्या दृष्टीने त्याची तयारी असावी
★ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा (MPSC,UPSC व इतर) साठी त्यांचा पाया पक्का असावा
★ १२ वी नंतर च्या प्रवेशा वेळी लाखो रुपये डोनेशन न भरता त्याला मेरिट वर ऍडमिशन मिळावे
★ शकतो नांव नोंदणी करा आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि पुढे येणाऱ्या आव्हानासाठी तयार राहण्यास मदत होते.