नवज्योत फाऊंडेशनच्या कार्याध्यक्षपदी सज्जनसिंघ सिद्धू -NNL


नांदेड|
येथील नवज्योत फाऊंडेशन या सामाजिक संस्थेेच्या कार्याध्यक्षपदी सज्जनसिंघ प्रतापसिंघ सिद्धू यांची सोमवार दि.18 रोजी निवड करण्यात आली. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नौनिहालसिंघ जहागीरदार यांनी ही निवड केली आहे.

सज्जनसिंघ सिद्धू हे उच्च विद्याविभूषित (एमएससी, बीएड, मॅथ) असून गेल्या बावीस वर्षांपासून यश कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते गेल्या दीड दशकापासून नवज्योत फाऊंडेशनशी निगडीत आहेत. त्यांच्यामध्ये नेतृत्व आणि वकृत्व असे गुण असल्यामुळे संस्थेच्या कार्याध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली, असे नौनिहालसिंघ जहागीरदार यांनी स्पष्ट केले. 

वरील निवडीबद्दल कुलप्रकाशसिंघ लिखारी, सतपालसिंघ गिल, परविंदरसिंघ शाहू, मनजितसिंघ संधू, गणपतसिंघ कामठेकर, नवज्योतसिंघ जहागीरदार, निर्वेरसिंघ खालसा, हरमितसिंघ रागी, मंगलसिंघ शेरे, सरजितसिंघ मठवाले, देवेंद्रसिंघ पटेल, दर्शनसिंघ शेंबोलीवाले, गुरुबचनसिंघ शिलेदार, सतपालसिंघ शिलेदार आणि डॉ.राजवंतसिंघ कदम्ब यांनी सज्जनसिंघ सिध्दू यांचे अभिनंदन केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी