परस्पर विरोधी गुन्ह्यात सरपंच महिलेच्या पतीसह इतरांवर गुन्हे दाखल
हिमायतनगर| तालुक्यातील आंदेगाव येथे दारू विक्रीच्या कारणावरून परसपर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात महिला सरपंचाच्या तक्रारीवरून चौघांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे तर विरोधी गटाच्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण व गळ्यातील दागिने काढून नेल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. एकूणच तालुक्यात सुरु असलेल्या अवैद्य दारूच्या धंद्यामुळे गावातील वातावरण बिघडत चालले असल्याचे दि.०४ रोजी घडलेल्या घटनेवरून दिसते आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मौजे आंदेगाव येथे अवैद्य रित्या दारूची विक्री केली जात असल्याची तक्रार काही महिलांनी सरपंच आम्रपाली उत्तमराव राऊत यांचेकडे केली होती. यावरून आगामी सण उत्सवात गावातील शांतता अबाधित राहावी यासाठी महिला सरपंच यांनी २० महिला साक्षीदारांना घेऊन दारू विक्री करणाऱ्याच्या घरी गेले होते. मात्र दारू विक्रेता हा त्याच्या घरी न थांबता तो रतंनबाई भुसावळ यांच्या घरी गेला होता. त्यामुळे येथील महिला मंडळी त्यांच्या घरी गेले असता दारू विक्रेर्याश त्यांच्या मुलांनी संगनमत करून सरपंच महिलेसह साक्षीदार महिलांना मारहाण केली आमच्या घराकडे कसं काय आले असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. आणि सरपंच महिलेचा हात पिंनगळाला. यावेळी साक्षिदार गंगाबाई भोजना डोईवाड, विमलबाई मिराशे यांनि सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही आरोपीतांनी मारहाण केली.
यावरुन सरपंच महिला आम्रपाली उत्तमराव राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहेमद रमजान शेख, शेख निसार, शे जब्बार या ३ व्यक्तिवर कलम १९८९ चे अधिनियम कलम ३ (१) (R) (५) sc, st, कायदा ३२३, ३४ भादवी अनुसार अट्रोसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास भोकरचे उपविभागणीय पोलीस अधिकारी तथा डीवायएसपी अर्चना पाटील या करत आहेत.
तर दुसऱ्या गटाच्या महिला हुजरत बी शे रमजान वय ७० वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून योगेश दत्ता आनचरटवाड, उत्तम गणपत राऊत, संतोष गंगाराम गटकपवाड, संतोष प्रकाश दासरवाड, यांच्यावर कलम ३२४, ३२७, ३३६, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. या चौघांनी दारू विकण्याचा व्यवसाय करणारी महिला रतनबाई भुसावळे, हिस तुम्ही त्यांना सहकार्य करता असे म्हणून उत्तम गणपत राऊत, याने फिर्यादी महिलेस मारहाण करून गळ्यातील १० ग्रॅम सोन्याची गलसर अंदाजे ४५ हजार किमतीचे तोडून नेले. तसेचं संतोष गटकपवाड याने फिर्यादीचा मुलगा शेख अहमद यास विटकर उचलून फेकून मारली. यामुळे त्याचे डोके फुटले संतोष प्रकाश याने फिर्यादीचा नातू जब्बार निसार यांना मारहाण केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली यावरून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक बी.डी. भुसनर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नंदलाल चौधरी हे करत आहेत.