हिमायतनगर| तालुक्यात येणाऱ्या मौजे सोनारी येथील शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारील कंटाळून आत्महत्या केली. घरचा करता व्यक्ती गेल्याने कुटुंब उघड्यावर आले असून, हि माहिती मिळताच खासदार हेमंत पाटील गोदावरी समूहाच्या आध्यक्ष राजश्रीताई पाटील यांनी पोळ्याच्या दिनी पोळ्याची दिवशी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार यांच्या माध्यमातून रेशनची किट पाठवून देऊन पोळा गोड केला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी येथील अल्पभूधारक शेतकरी विजय जयराम वाघमारे वय ४७ वर्ष यांनी सततची नापिकी आणि यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. घरचा करता व्यक्ती गेल्याने शेतकऱ्याच कुटुंब निराधार झाला आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात २ मुले, पत्नी असून, यांचा उदरनिर्वाहासाठी शासनाकडून तातडीने मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन खासदार हेमंत पाटील गोदावरी समूहाच्या आध्यक्ष राजश्रीताई पाटील यांच्याकडून देण्यात आलं आहे. यावेळी मयत शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्य गावातील नागरिक, व पत्रकार उपस्थित होते.
यावेळी मयत शेतकऱ्याचे बंधू यांनी म्हंटल कि, माझे भाऊ बैंकेच्या कर्जाची नोटा असल्यामुळे डिप्रेशनमध्ये गेले होते, याच चिंतेत त्यांनी कुनालयी न सांगता विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे शासनाने याची दाखल घेऊन तातडीने मदत तर द्यावीच आणि बैंकेत असलेल्या कर्जमाफी करून शेतकरी भाच्या परिवाराला जगण्याची ऊर्जा द्यावी अशी विनंती त्यांनी केली.