‘घरो घरी तिरंगा’ अभियानाचे राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ -NNL


नवी दिल्ली|
दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात ‘घरो घरी तिरंगा’ अभियानाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या  हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.

येथील कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनात आज सकाळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते ‘घरो घरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.  याप्रसंगी माजी खासदार हरिभाऊ राठोड, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव , सचिव तथा आयुक्त (गुंतवणूक  व राजशिष्टाचार) निवासी आयुक्त (अ. का.) डॉ. निधी पांडे , सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, महाराष्ट्र परिचय केंदाच्या प्रभारी उपसंचालक (माहिती)  अमरज्योत कौर अरोरा,  यांच्यासह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी तसेच  सदन येथे निवासी असलेले अभ्यागत मोठ्या संख्यने उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी ध्वज उंचावून ‘घरो घरी तिरंगा’ या अभियानाचा रितसर शुभारंभ करुन माहिती विभाग परिचय केंद्राच्या वतीने  राबविल्यात येणा-या ‘घरो घरी तिरंगा’ या अभियानाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित  मुख्य सचिव श्री. श्रीवास्तव, श्रीमती पांडे यांच्यासह उपस्थितांनीही ध्वज उंचावून ‘वंदे मांतरम्’ , ‘भारत माता की जय’ या उद्घोषणा दिल्या. या उदघोषणांनी महाराष्ट्र सदन  निनादले. 

दिल्लीत मराठी भाषीक लोकांची जवळपास अडीच लाख लोकसंख्या असून, हे लोक दिल्ली व परिसर क्षेत्रात वास्तव्यास आहेत. या सर्वांची नाळ महाराष्ट्राशी जुळलेली असून  राज्यात साजरे केले जाणारे सण , उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम सार्वजनिकरित्या  साजरे केले जातात.  महाराष्ट्र शासनाच्या दिल्ली स्थित कार्यालयांच्या समन्वयातून यांना एकत्रित करुन अनेकदा कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन केले जाते.  ‘घरो घरी तिरंगा’ (हर घर तिरंगा)  हा अभिनव उपक्रमा अंतर्गत दिल्ली  स्थित विविध क्षेत्रात काम करणा-या मराठी भाषीक  मान्यवरांच्या हस्ते ‘घरो घरी तिरंगा’  अभियानाचे महत्व पटवून, या अभियानाचा प्रचार प्रसार परिचय केंद्राच्या  समाज माध्यमांवरुन प्रसूत केला जाईल.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी