नांदेड| मध्य रेल्वे ने कळविल्या नुसार माजरी ते वणी दरम्यान रेल्वे पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्यामुळे हे सेक्शन रेल्वे वाहतुकी करिता तात्पुरते बंद करण्यात आले आहे.
परिणामी, गाडी संख्या 17610 पूर्णा – पाटणा साप्ताहिक एक्स्प्रेस ला आज दिनांक 11 ऑगस्ट, 2022 रोजी बसमत-हिंगोली-वाशीम-अकोला-बडनेरा मार्गे वळविण्यात आले आहे. या बदलामुळे आज हि गाडी नांदेड, हिमायत नगर, सहस्त्रकुंड, किनवट, आदिलाबाद, वणी, माजरी आणि वरोरा रेल्वे स्थानकांवरून धावणार नाही. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी हि विनंती.