नारळी पौर्णिमेच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा -NNL


मुंबई|
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने साजरा होणारा रक्षाबंधन हा सण केवळ बहीण-भावाच्या नात्यातील गोडवा वाढविणारा नाही तर प्रत्येक नात्याला घट्ट करणारा आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस आपल्या शुभसंदेशात म्हणतात, भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.  रक्षाबंधन हा महत्त्वाचा सण असून राखीचा रेशमी धागा भाऊ - बहिणीचे नाते सुदृढ करणारा असतो. राखीच्या धाग्याचे महत्त्व ऐतिहासिक काळात अनेकदा अधोरेखित झाले आहे.  

हा सण बहिण-भावाच्या नात्याचा असला तरी त्याची मर्यादा तेवढीच नाही. देशाच्या सिमेवर आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांसाठी लाखो भगिनी, विद्यार्थी आणि नागरिक राखी पाठवून त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करतात. तसेच या निमित्ताने झाडांना राखी बांधून अनेकजण आपले पर्यावरणप्रेमही व्यक्त करतात. ७२० किलोमीटरची सागरी किनारपट्टी लाभलेल्या महाराष्ट्रातील कोळीबांधवांसाठी नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा असून याच दिवशी सागराची पुजा करून मच्छिमार आपली नौका समुद्रात सोडतात. यानिमित्ताने मच्छिमारांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या असून त्यांनी वेधशाळेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी