हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक भाजपा स्वबळावर लढविणार-आ राम पाटील रातोळीकर-NNL

नगरपंचायतचे अनुषंगाने भाजपचे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, जनमत घेऊन रिंगणात उतरावं


हिमायतनगर।
काल हिमायतनगर शहरांमध्ये भाजपातर्फे नगरपंचायतच्या अनुषंगाने नगरपंचायत व तालुक्याचे प्रभारी यांची आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या उपस्थितीमध्ये तालुका व शहर आढावा बैठक संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांनी शहरातील व तालुक्यातील येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने भौगोलिक माहिती पक्ष बांधणी संदर्भातली माहिती पक्ष प्रभारी आमदार राम पाटील रातोळीकर साहेबांना दिली येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे नेतृत्व व जिल्ह्यातील वरिष्ठ नेते मंडळाच्या सहकार्याने नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या होईल व जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याच्या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी तालुका प्रभारी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले भाजपामध्ये प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी स्वतःहे ब्रीदवाक्य आहे. या शब्दा प्रमाणे हिमायतनगर मध्ये आम्ही काम करू तसेच नगरपंचायत मध्ये मागील पाच वर्षात दोन वेगवेगळ्या पक्षांमध्ये सत्तांतर झाल्यानंतर विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे काम दोन्ही सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आले.

 त्यामुळे हिमायतनगर शहराची जनता यांच्या कामाला अत्यंत नाराज असल्याचे त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हिमायतनगर नगरपंचायत मध्ये विकास कामाला कोणत्याही प्रकारची निधी कमी न पडू द्यायचे अभिवचन त्यांनी दिले. तसेच तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्रजमान (पाऊस) झाल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहेत त्या नुकसानी संदर्भात त्यांनी जिल्ह्याचे नेतृत्वासोबत जाऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीची भेट घेण्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.

 येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हिमायतनगर तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या विकास कामाला कधीच अडथळा येणार नाही व तालुक्यातील विकासाला जो ब्रेक मागील सात-आठ वर्षापासून बसले आहे ते कायमचा काढून नव्याने तालुक्यात विकास करण्यात भारतीय जनता पार्टी सदैव तयार राहील असे अभिवचन त्यांनी या बैठकीच्या माध्यमातून सर्व भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी दिले.

 यावेळी भारतीय जनता पार्टीचे ता.अध्यक्ष आशिषभाऊ सकवान, सरपंच सुधाकर पाटील, किशनराव वानखेडे, यल्लपा गुंडेवार, सौ ज्योतीताई बेदरकर.सौ लताताई रुघे.संजय गोसलवाड.शहर अध्यक्ष खंडू चव्हाण, कांता गुरू, युवा मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, श्रीयन कदम, कोमलवार, राहुल पाटील देवसरकर, किशोर रायेवार, कल्याणसिंह ठाकूर, ज्ञानेश्वर पंदलवाड, महेशराव अंबिलगे, सरपंच पवन करेवाड, राम पाकलवार, उपसरपंच रुपेश नाईक,सरपंच जीवन जैस्वाल, सुभाष माने, मधुकर पांचाळ, अभिलाष जयस्वाल, दत्ता शिराने, विठ्ठलराव सुर्यवंशी, ज्ञानेश्वर शेवाळे, हिदाईत खान., विनायक ढोणे, परमेश्वर सुर्यवंशी, दिपक बाष्टेवाड, वामनराव पाटील,

दुर्गेश मंडोजवार, राम जाधव, बालाजी ढोणे, अनिल फाळके, गंगाधर मिरजगावे, म्नोज पाटील, केदार पोपष्टवार, काशिनाथ गड्डमवार, आकाश नलावडे, सुरज चिंतावार, अनिल माने, दिलीप आरेपल्लु, राहुल खडके, निलेश दरणे, परमेश्वर यमलवाड, प्रदीप उट्टलवाड, परमेश्वर जाधव, प्रकाश सेवनकर, अजय संकुलवार, अक्षय राहूलवाड, शंकर बरडे, रेणुकादास वाळके, विनोद दुर्गेकर, माधवराव पाटील, सूरज चिंतावार, अजय जाधव, विकास भुसावळे,विश्वजित वानखेडे, नितीन मुधोळकर, संजय कुरमे, प्रमोद शिरफुले, जांबुवत मिराशे, प्रशांत ढोले, संतोष डांगे, ज्ञानेश्र्वर कोरडे, विशाल कदम, गोविंद कांबळे, संतोष सुर्यवंशी, निलेश चटणे, अमोल माने, साहेबराव वानखेडे, मारोती जाधव, अनिल राऊत यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी