श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या मागणीला यश -NNL

सकारात्मक प्रतिसाद देत तिरुमला तिरूपती देवस्थानकडुन आजच छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मुर्ती व स्टिकर्स वरील बंदी हटवली


नांदेड/तेलंगणा। 
श्री तिरुमला तिरूपती देवस्थान येथे गेले 15  दिवसापासून अखंड हिंदुस्थानचे दैवत असणारे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा प्रतिमे संदर्भातील सोशल मीडियावर अनेक फोटो व व्हिडीओ प्रसारीत होत आहेत. त्यासंदर्भातील नेमके तथ्य व सत्य जाणुन घेण्याच्या हेतुने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष मा श्री नितीन दादा चौगुले यांच्या आदेशानुसार काल श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे मराठवाडा मुलुख मदानी तोफ म्हणुन प्रसिद्ध श्री संतोष भाऊ देवकर यांनी मा.श्री जी. किशन रेड्डी साहेब, संस्कृती ,पर्यटन व उत्तर- पुर्वी क्षेत्र केंद्रीय विकास मंत्री, भारत सरकार यांना प्रत्येक्षात भेटुन काल दिनांक 30 जुलै 2022 रोजी निवेदन देत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची मुर्तीभेट देऊन संबंधित प्रकारणाचे गांभीर्य लक्षात आणुन दिले. त्याच प्रकारे संबंधित घटनेचे काही व्हिडीओ केंद्रीय मंत्री महोदयानां देऊन प्रकरणातील दोषी असणाऱ्या अधिकारी वर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली ,त्याच बरोबर जर संबंधित घटना भविष्यात घडल्यास त्यामुळे जातवाद,भाषावाद ,प्रांतवाद देखील उद्भवू शकते हे लक्षात आणुन दिले.

 


निवेदन देत असताना श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान चे मराठवाडा प्रमुख श्री संतोष भाऊ देवकर यांच्या सोबत सचिन शिंदे, प्रमोद पाटील वानखडे, निलेश गिरबिडे ,चेतन निर्मल पाटील, व्यंकटेश बाभुळकर  हे सहकारी हजर होते. निवेदन स्विकार करीत असताना मा श्री जी. किशन रेड्डी सर यांनी आम्ही देखील शिवभक्त आहोत असे म्हणत त्यांच्या कार्यालयात असणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा दाखवली जर असा काही प्रकार घडल असेल तर आम्ही ते सहन करणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असे अभिवचन दिले.

तसेच श्री शिवाजी महाराज यांचा इतिहास जोपासना करण्यासाठी लवकरच महाराष्ट्र मध्ये श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून  100 कोटी रुपये निधि देणार असल्याची घोषणा मा.श्री जी. किशन रेड्डी साहेब, संस्कृती ,पर्यटन व उत्तर- पुर्वी क्षेत्र केंद्रीय विकास मंत्री, भारत सरकार यांनी या प्रसंगी केले. 


त्याच प्रकारे तिरुमला तिरूपती मंदिर देवस्थान, चे समिती सदस्य मा.श्री बि. रविंद्र यांची भेट घेऊन श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान च्या वतीने निवेदन देऊन संबंधित घटनेचे निषेध नोंदवून शिव शंभु भक्ताचा रोष ओडवुन घेऊ नये असे सांगितले. त्यावेळी श्री बि . रविंद्र यांनी तातडीने पाऊले उचलुन तिरुमला तिरूपती देवस्थान चे कार्यकारी अधिकारी श्री ए.व्ही रेड्डी यांना या संदर्भात सुचना करून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान चे निवेदन विषयी कळवुन लवकरात लवकर संबंधित प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावुन शिवभक्तांच्या भावनेचा आदर करण्याचे सुचना केले.


त्या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठानयुवा हिंदुस्थानच्या वतीने तिरुमला तिरूपती देवस्थान चे समिती सदस्य श्री बि.रविंद्र व विश्व हिंदु परिषद चे श्री जे श्रीधर यांचासह आंध्रप्रदेश चे वरिष्ठ नेते श्री महेश शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी  श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे मराठवाडा प्रमुख श्री संतोष भाऊ देवकर यांच्या सोबत सचिन शिंदे, प्रमोद पाटील वानखडे, निलेश गिरबिडे ,चेतन निर्मल पाटील, व्यंकटेश बाभुळकर  हे सहकारी हजर होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी