अर्धापूर| आत्मनिर्भर किसान प्रोडूसर कं. लि व आयडियल ॲग्री सर्च यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि. 17 ऑगस्ट वार बुधवार मालेगाव येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित कार्यक्रमांमध्ये उद्घाटक म्हणून वनामकृवि परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास डॉ. देवराव देवसरकर संचालक विस्तार शिक्षण वनामकृवि परभणी ,श्री आर बी चलवदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड, वैभव कुमार जाधव डेव्हलपमेंट मॅनेजर प्रा लि.,डॉ. टी.जी. चिमणशेटे कृषी विकास अधिकारी जि.प.नांदेड, बी. सी.बकाल झोनल मॅनेजर आयडियल ॲग्री सर्च प्र.लि, तालुका कृषी अधीकारी अनिल शिरफुले संतोष गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी मालेगाव परिसरातील् मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी उपस्थित दर्शवली शेतकरी मेळाव्यामध्ये हळद व केळी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दत्ता पाटील धामदरीकर, गजानन कोटकर , मारोती देमे, सतीश आरसुळे, राजकुमार मदने यांनी परिश्रम घेतले.