हिमायतनगर। आम्ही स्वातंत्र भारतात मोकळा श्वास घेत आहोत ते काही फुकटात मिळालेले नाही तर त्यासाठी स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतीकारकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे ही बाब तमाम भारतीयांनी कदापी विसरता कामा नये. असे मत ग्रामपंचायत सदस्य तथा सोसायटी संचालक संतोषराव आंबेकर यांनी स्वातंत्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. ध्वजारोपण गावातील माजी सैनिक किसनराव गुरगुटवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
मौजे मंगरूळ येथे "हर तिरंगा" अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील प्रत्येक नागरिक या महोत्सवात सहभागी झाला होता. जि.प.कें.प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत आणि विविध सहकारी संस्था मंगरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने गावातुन " तिरंगा रॅली" काढण्यात आली. यामधून गावकर्यांना सामाजिक संदेश देऊन देशाभिमान रूजवण्याचा प्रयत्न केला गेला.
हा आझादी का अमृत महोत्सव सरपंच सौ.दिव्या जीवन जैस्वाल , मुख्याध्यापक खिराडे सर. केंद्रप्रमुख बाचकलवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला तर हा संपूर्ण महोत्सव यशस्वी. करण्यासाठी. सर्व शिक्षक पोपलवार सर, निलगीरवार सर, उपलंचवार सर, पाटील सर, फुंदे सर,अंगणवाडी ताई,उप सरपंच आनंदा पेनटेवाड, मा.संचालक सुभाषराव जललवाड, संदिप कुंजरवाड अध्यक्ष,शाळा सुधार समिती, बालाजीराव पावडे ग्रा.पं.सदस्य, संचालक मारोती सोमनवाड,रमेश सादलवाड, विश्वनाथ आनंतवार, तुकाराम सादलवाड, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाषराव गुलझरवाड, उपाध्यक्ष सतीश पावडे,पोतना आकेमवाड, मारुती कुंजरवाड,विश्वनाथ आनंतवार, मारोती पैलवाड, मारोती आचकुलवार,गजानन कुंजरवाड,गजानन रुद्र बोईनवाड , शंकर गुंठेवाड,विठ्ठल खंदारे,रुद्रा गुलझरवाड,दिगंबर राजुरवाड,अशोक घोगेवाड, प्रकाश बोरकर, भगवान पाईकराव, बालाजी गुंठेवाड, कोंडबा गोडाडे,अंकुश आंबेकर.व गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले.