हिमायतनगर| तालुक्यात सर्वत्र बैलपोळा सण शांततेत साजरा झाला असताना तालुक्यातील मौजे एकंबा येथील बैलपोळा सणानिमित्त लग्नसोहळा पार पडताना शेवटच्या मंगलाष्टकवेळी धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ मारामारी झाली. यामुळे पोळा सणाला गालबोट लागले गेले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथे पारंपरिक पद्धतीने बैलपोळा मिरवणूक काढून मारोती मंदिरासमीप सायंकाळी ५ वाजता लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. लहान ओशाळा सुरु झाल्यानंतर शेवटचे मंगलाष्टक होताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात बाचाबाची झाली याचे पर्यवसान भांडणात होऊन मारामारी झाली. या प्रकरणी होमगार्ड पांडुरंग उत्तम काइतवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात ७ जणांवर कलाम १६० भादंवि प्रामणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बिडी भूसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कागणे ह्या करीत आहेत.