छावा संघटनेच्या बैलगाडी मोर्चात मुखेड तालुक्यातील हजारो शेतकरी सामिल होणार - गिरीधर पा. केरूरकर
मुखेड, रणजित जामखेडकर। जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थीक मदत करावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी धडक बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात मुखेड तालुक्यातील हजारो शेतकरी सामिल होणार असल्याची माहिती अखील भारतीय छावा संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील शिंदे केरुरकर यांनी सांगितले दिली.
आज पर्यंत शेतकऱ्यांना पुळका दाखवणारे लोकप्रतिनिधी विकासाच्या गप्पा मारणारे सरकार मंत्री पदात मग्न आहेत तर राजकीय पुढारी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करित असल्यामुळे आज बळीराजावर उपासमारीची वेळ आली तर बळीराजाला आत्महत्या करणे हाच पर्याय शिल्लक राहिला असून बळीराजाच्या विविध मागण्यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्या राजकीय पुढारी व प्रशासनास जागे करण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी धडक बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चाचे प्रमुख नेतृत्व अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब पा.जावळे, विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष विजयकुमार पा.घाडगे,प्रदेश अध्यक्ष पंजाबराव पा.काळे,जिल्हाध्यक्ष माधवराव पा.ताटे,जिल्हाध्यक्ष दशरथ पा.कपाटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. तरी शेतकरी बांधवांनी या बैलगाडी मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे आव्हान गिरीधर पा.केरूरकर यांनी केले आहे.