हिंगोलीत मात्र आत्तापर्यंत कोणत्याही सरकारनी दली नाही तेवढी मोठी मदत हे सरकार करेल असं आश्वासन त्यांनी दिल.
नांदेड| महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी पहिल्यांदाच नांदेड व हिंगोली दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना त्यांनी शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र ही घोषणा दिली. त्यामुळे मागील दोन महिन्यांत अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत गरजेची आहे, ते येथे मदतीची घोषणा करतील असे वाटत होते. मात्र त्यांनी यथे घोषणा तर केलीच नाही आणि शेतकऱ्यांच्या बांधावरही गेले नसल्याने भ्रमनिराशा झाली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचा नांदेड दौरा तीन वेळा बदलला गेला. त्यानंतरही अखेर त्यांनी सोमवारी नांदेडमध्ये उपस्थित होऊन दौरा केला. अतिवृष्टीने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले मात्र शेतकऱ्यांच्या मदतीची काही ठोस घोषणा झाली नाही. केवळ नांदेड उत्तर मतदारसंघातील १९२ कोटींच्या होणाऱ्या रस्त्यांचे ऑनलाइन भूमिपूजन त्यांनी केले. तसेच नांदेडमध्ये विकासाची गंगा आणू, असे आश्वासन त्यांनी दिले. विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. नांदेड मनपा अंतर्गत उत्तर मतदारसंघातील मूलभूत सुविधा, हिंगोली जिल्हा सीमा ते आलेगाव-निळा-नांदेड व परभणी जिल्हा सीमा ते पूर्णा-नांदेड रस्त्याचे दुपदरीकरण, आसना नदीवरील पासदगाव जवळील नवीन पुलाच्या कामाचे प्रातिनिधिक भूमिपूजन करण्यात आले.
शेतकऱ्यांना मदत देऊ -शिंदें - हिंगोलीत सभा घेतली यात शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत देऊ असे आश्वासन दिले. यासह ८० हजार पदांची भरती, कळमनुरीच्या लमाणदेव मंदिरासाठी ५ कोटी, आदिवासी भवनसाठी ५ कोटींचा निधी देऊ, असे त्यांनी जाहीर केले.