हिमायतनगर| येथील भूमिपुत्र व स्व. मोहम्मद मुर्तुजा सेठ यांचे जेष्ठ चिरंजीव तथा येथील प्रतिष्ठित किराणा व्यापारी मजहर मौलाना यांचे पुतणे डॉक्टर मोहम्मद अब्दुल रहेमान यांची नाक - कान - घसा तज्ज्ञ वर्ग -१ वर पदोन्नती झाली आहे.
त्यांची पदोन्नती झाल्याबद्दल हिमायतनगर शहराचे नाव आणखी उज्वल झाले आहे. याबद्दल हिमायतनगर शहरातील सर्व जनतेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अश्रफ भाई, मुजीब खान, मोहम्मद जुबेदुल्लाह यांची उपस्थिती होती.