हदगाव, शे चांदपाशा| हदगाव शहरात परिसरात अनेक रस्त्यावर वृक्षरोपणाची अत्यंत गरज असुन शहरात काही भागात आता पर्यंत वृक्षरोपण झालेलं वृक्षरोपण एक सामाजिक संघटनानेच गत वर्षी काही ठराविक ठिकाणी केले वृक्ष लागवडीचे प्रमाण कमी झाल्याने शहरात व परिसरात तापमाणात वाढ होतांना दिसुन येत आहे.
विशेषतः हदगाव तालुक्यातील गाव राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गावर वृक्षलागवड होणे अत्यंत गरजचे असल्याचे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहे शहरात अनेक बिल्डर व धानड्य प्लाटधारकांनी प्लाट विक्री केली नफा ही कमवला माञ झाडे लावली नाही त्या ठिकाणी वक्षरोपण होणे अत्यावश्यक आहे या प्लाटधारकाच्या कंपाऊडच्या बाहेर जे वृक्षरोपण करु शकतात त्यांना हदगाव न.पा.कडून ट्री-गार्ड उपलब्ध करुन दियावे अशी मागणी वृक्षप्रेमी मध्ये दिसुन येत आहे हदगाव शहरात मुख्य काँलनी मुख्यमार्ग वृक्षरोपणापासुन वचीत आहे या कडे न.पा. वनपरिक्षेञ व सामाजिक वणीकरण विभागाने लक्षदेण्याची अवश्यकता अशी मागणी ही होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग वर ही वृक्ष लागवड नाही
शहर तसेच हदगाव [गोजेगाव] ते वारंगा या रोडघ राष्ट्रीय महामार्गाच काम गेल्या तीन ते चार वर्षापासून संथगतीने चालु असुन, या रोडवर विविध जातीचे हजारो वृक्षाची या राष्ट्रीय महामार्गाकरिता कत्तल करण्यात आलेली असुन या राष्ट्रीय महामार्गावर माञ आता पर्यंत वृक्षलागवड करण्यात आलेली नाही हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.
वनपरिक्षेञ व सामाजिकवणीकरण हे काय करतात
हदगाव शहरात वनपरिक्षेञ व सामाजिक वणीकरण कार्यालय असुन ही कार्यालय नागरिक व पर्यावरण वृक्षप्रेमी पासुन खुप लांब राहतात. यात समन्वय नसल्याने दरवर्षी वृक्षलागवड नेमकी कुठं होत आहे हे कळवायास मार्ग नाही या बाबतीत आता तालुक्याचे विद्यमान आमदारच जाब विचारु शकतात. कारण हे आधिकारी सर्वसामान्य नागरिकांना जुमानत नाही अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे.