राज्यातील महानगरपालिकातील शिक्षक / कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेमधील नियुक्ता अंशदान 14% देऊन त्यांची खाते NSDL कडे वर्ग करा -NNL

नगर विकास विभाग विभागाचा 22  फेब्रुवारी 2022 चा नवीन पेन्शन बाबतचा शासन आदेश.. 


नांदेड|
वित्त विभागाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू झाली आहे. या योजनेनुसार पात्र कर्मचाऱ्यांच्या / शिक्षकांच्या वेतनातून 10% अंशदान तसेच नियुक्ता अंशदान 10% व ऑगस्ट 2019 पासून 14 % देणे बंधनकारक आहे. तसेच ही रक्कम NSDL कडे वर्ग करणे गरजेचे असतानाही त्यांनी महापालिका सेविंग अकाउंटवर जमा केली आहे. ज्याचा परतावा अत्यल्प आहे. तसेच महानगरपालिकेकडे शिक्षकांच्या वेतनातून 10% कपात नियमितपणे केली जाते. परंतु त्यांना नियुक्ता अंशदान केवळ 5% दिले जाते. उर्वरित 5% अंशदान दिले जावे. याबाबत शिक्षकांकडून तसेच संघटनांकडून वारंवार विनंती करण्यात आली. इतर महानगरपालिका मधील माहिती सुद्धा देण्यात आली. परंतु या मागणीची वेळीच दखल न घेतल्यामुळे आज शिक्षकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

फरकाची रक्कम वाढली आहे यामुळे शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. तरी खतगांवकर साहेब आपण महानगर पालिकेकडील शिक्षक /कर्मचाऱ्यांचे शासन नियमानुसार  विहित नियुक्ता अंशदान द्यावे व जमा होणारी रक्कम अधिकृत एन एस डी एल कडे (NSDL) वर्ग करावी. याबाबत महापालिकांना आदेश द्यावेत अशी कळकळीची विनंती शिक्षकाकडून खतगांवकर यांचेकडे देण्यात आले आहे.

नगर विकास विभागाच्या जीआर नुसार ज्या महापालिका नमूद शासन निर्णयानुसार नियुक्ता अंशदान देत नाहीत. त्या महापालिकांना देण्यात येणारे जीएसटी निधीमधून कर्मचाऱ्यांची NPS रक्कम एनएसडीएल कडे वर्ग करावी व कर्मचाऱ्यांचे भविष्याचे रक्षण करावे अशी विनंती निवेदनातून करण्यात अली आहे. सगळे शिक्षक मराठवाडा विदर्भातील आहेत. २५०० कर्मचाऱ्यांना 14% देतात फक्त 90 शिक्षकांना वगळत आहेत. अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महापालिकेतील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर ही वेळ आलेली आहे. कृपया याकडे लक्ष घालावे अशी विनंती खतगांवकर साहेब यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. 

महापालिका गर्भश्रीमंत आहेत नगर विकास विभाग हा तगड्या मंत्र्यांनाच दिला जातो. कदाचित हीच आमची कमकुवत बाजू असेल... कर्मचारी सजग नसल्यामुळे आणि भविष्याचा त्यांनी विचार न केल्यामुळे आज जी वेळ आली आहे. ती २००५ नंतर नियुक्त महापालिकेत कर्मचाऱ्यावर येऊ शकते. कारण गेल्या दहा वर्षापासून नियमित कपात होऊन ही NPS मध्ये न भरल्यामुळे दुर्दैवाने एखादी कर्मचारी मयत झाला तर दोन हजार पेक्षाही जास्त पेन्शन मिळू शकणार नाही अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे महापालिकेमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन 12 सप्टेंबर पासून आमची खाती nps मध्ये वर्ग करावीत या एकमेव मागणीसाठी काळी फिती लावून काम करण्याच्या आंदोलनात सक्रीय सहभागी व्हावे असेहि कळविण्यात आले आहे.

कै. अनिरुद्ध प्रमोद शेटे हे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये घरफाळा विभाग अधीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांचा पगार हा किमान 40 हजार रुपये होता. त्यांच्या पगारातून नियमितपणे 10%  कपात केली जात होती. 2018 मध्ये नियुक्त झालेल्या शेटे साहेबांचे 2022 मध्ये दुर्दैवी निधन झाले.. त्यांना एक तीन वर्षाची कन्या आहे. आज पर्यंत त्यांच्या फॅमिलीला पेन्शन म्हणून कुठलीही रक्कम मिळालेली नाही... तसेच त्यांच्या पगारातून जी रक्कम कपात झाली ती सुद्धा मिळाली नाही. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.. अशी दुर्दैवी वेळ कोणावरही येऊ नये.. त्यामुळे आमची जी रक्कम कपात होते ती अधिकृत एनपीएस मध्ये खात्यात जमा करावी. असेही निवेदनात म्हंटले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी