राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्याचा प्रदेश उपाध्यक्ष पदी कन्हैया कदम यांची निवड -NNL

वेळोवेळी विधार्थ्याच्या न्याय हक्का साठी संघर्ष करणाऱ्या ज़िल्हाध्यक्षाला मिळाली या निवडीच्या स्वरूपाने कामाची पोच पावती विधार्थ्यांकडून आनंद व्यक्त  


नांदेड|
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी मुंबई येथील पक्ष कार्यालयात कन्हैया कदम यांची राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेसच्या प्रदेशउपाध्यक्ष पदी नियुक्ती केली. 

कन्हैया कदम यांनी सन 2012 रोजी माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर ज़िल्हाध्यक्ष डाँ.सुनील कदम यांच्या नेतृत्वामध्ये काम करायला सुरुवात केली व त्यांच्या राजकीय जीवनाला राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेसच्या माध्यमातून सुरुवात झाली तसेच तालुका उपाध्यक्ष या पदावर सुरुवातीला त्यांनी काम केले नंतर 2013 ते 2017 पर्यंत त्यांनी ज़िल्हाउपाध्यक्ष पदी काम केले .सन 2017 मध्ये त्यांच्या राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेस नांदेड चे ज़िल्हाध्यक्ष म्हणून पक्षाने जबादारी सोपवली.

ज़िल्हाध्यक्ष झाल्या पासून पायाला फिंगरी लावल्या सारखा विध्यार्थ्यांच्या न्याय हाका साठी वेळो वेळी मोर्च,वेगवेगळे आंदोलन ,निवेदने त्या मध्ये प्रामुख्याने बगायला गेलं तर महामंडळच्या बस ची पास हि विधार्थी यांच्या साठी मोफत करून घेतली ,आपत्तीग्रथ भागातील शेतकरी व शेतमजुरांची परीक्षा फीस 4.55 कोटी रु माफ करून घेतले ,नोकरी मेळावाच्या माध्यमातून 788 गरजूना पुणे ,मुंबई ,बंगलोर या ठिकाणी नोकरी मिळवून दिली,स्वाधार योजनेतील त्रुटी मधील विध्यार्थ्यांना 14 कोटी रुपय तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मदतीने मिळवून दिले.

विद्यापीठातील बोगस डिग्री प्रकरण बाहेर काढले ,SGGS महाविद्यालयातील 108 विधार्थी यांना महाविद्यालय प्रशासनाने यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे नापास तसेच वर्ष वाया गेले होते तिथे 7 दिवस उपोषण करून त्या विध्यार्थाना पास करण्यास भाग पाडले ,विद्यापीठात वेळो वेळी आंदोलन-निवेदन देऊन विध्यार्थाना न्याय मिळून दिला तसेच आता पर्यंत फक्त विद्यापीठ बंद करून कदम यांनीच करून दाखवले,मायोका सारख्या स्पर्धा घेऊन नांदेड मधील कलागुणांना वेगळं राज्य पातळीवर व्यासपीठ तयार करून दिले , कोरोना काळात नांदेड ज़िल्हातील बरेच चे विधार्थी हे मोरिसेस या देशात अडकले होते त्याना भारतात परत आणण्यासाठी खा.सुप्रियाताई सुळे यांच्या शी संपर्क करून मदत करण्याची मागणी केली.

खा.सुप्रिया सुळे यांनी तात्काळ केंद्रीय मंत्री परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी संपर्क करून त्यांना तातडीने मायदेशात आणलं इत्यादी विधार्थी हिताचे काम कदम यांनी केले तसेच 4 प्रदेशाध्यक्ष सोबत काम करण्याचा त्याचा दांडगा अनुभव असल्या मुळे व कदम यांनी केलेल्या कामाच्या बळावर त्यांनी प्रदेशउपाध्यक्ष पदी निवड पक्षश्रेष्ठीनि केली या वेळी रा,यु,काँ. प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख ,रा.कॉ.चे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे ,विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम इत्यादी उपस्तीत होते या निवडली बदल सर्व विधार्थी व त्यांच्या पालकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी