नैसर्गिक नाल्याच्या पाण्याचा प्रवाह आडविला अनेकाच्या घरात पाणी शिरले; स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा नागरिकाचा इशारा -NNL


हदगाव, शे चांदपाशा|
हदगाव शहरातील डोंगरगाव रोडाच्या बाजुला कदम नगरातील काही धानड्य प्लाटधारकांनी चक्क नैसर्गिक नाल्यावरच पक्के बाधकाम केल्यामुळे डोगरगाव रोडवरच पाणी साचल्यामुळे डोगरगाव गावक-यानी रस्ता रोको केला होता व या नाल्याच्या पाण्यामुळे वाहतुकीला ञास तर होतच आहे. या कदम नगरातील काही रहीवाशीच्या चोहोबाजुनी नैसर्गिक नाल्याचे पाणीच पाणी झाल्याने तेथील नागरिकांना तिथे राहणे कठीण झाले. एका नागरीकाने तर जर नाल्याच्या पाण्याचा श्रोत नाही काढल्यास चक्क १५ आँगष्ट स्वातंत्र्य दिनी आत्महदन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. सदर प्लाटीग एका राजकीय नेत्यानी विक्री केल्याने स्थानिक प्रशासन सुद्धा याप्रक्रणी हतबल झालेल्याचे दिसुन येत आहे.

या बाबतीत मिळालेली माहीती अशी की, हदगाव शहरातील डोगरगाव रोडच्या बाजुला कदम नगर वसलेले आहे सदर प्लाँटीग ही एका बड्या राजकीय नेत्यान विक्री केले . असे अनेक भुखंड पाडुन अनेकांना विक्री केली आहे हा नगर सदन म्हणुन ओळखला जातो. ह्याच भागात तालुक्याचे विद्यमान आमदार व माजी आमदार यांचे टुमदार बगले आहेत. यामुळे या भागाच्या प्लाटींगला चांगलाच सोन्यासारखा भाव मिळत आहे. यामुळे काही धानड्य भुखँड धारकांनी तर चक्क या भागातुन नैसर्गिक नाला वाहतो यावरच काही महाभागांनी प्लाँटचे बाधकाम करुन नाल्याच्या पाण्याचा प्रवाहच बदलुन टाकला.

परिणामस्वरुप पावसाळ्यात या नाल्याचे पाणी चक्क डोगरगाव रोडवर आल्याने डोगरगाव पिगळी आदी गावाच्या वाहतुक बंद पडलेली आहे. या बाबतीत डोगरगावच्या गावक-यानी या बाबतीत हदगाव नगरपरिषदेला निवेदन देवून दि.29 जुलै 2022 ला हदगाव शहरात डाँ निळे यांच्या नेतृत्वाखाली  मुख्य तामसा रोडवर रास्ता रोको केला होता. तरी ही प्रशासनाने दखल घेतलेली नाही अस त्यांचे म्हणने आहे. या नैसर्गिक नाल्याचा पाण्याचा प्रवाह रोकल्या मुळे येथील रहवाशी गजानन महाजन यांनी पण यापुर्वी म्हणजे १७ जाने २०२२ नंतर २० जाने २२ जाने तिसरा अर्ज ९ फेब्रुवारी चौथा अर्ज २७ जुलै देवून ही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने त्यांनी वैतागून येणाऱ्या १५ आँगष्ट २०२२ च्या स्वातंत्र्यदिनी ' आत्मदहनाचा इशारा लेखी पञाद्वरे दिल्याने प्रशासन खडबडून जाग झाल.

नंतर राजकीय दबाव येताच कागदोपञी खेळ सुरु झाल अस तेथील संतप्त ञस्त नागरिकांच म्हणन आहे. तरी ञस्त नागरिक गजानन महाजन यांनी प्रशासनाला दिलेल्या तक्रारीनुसार जर १४ आँगष्ट २०२२ पर्यत या नैसर्गिक नाल्याच पाण्याचा प्रवाह नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहनुसार (प्रशासकीय नकाशा) नुसार न काढल्यास देशाच्या स्वातंत्र्यच्या ७५ व्या अमृत महोत्सवाच्या दिनी म्हणजे १५ आँगष्ट २०२२ रोजी हदगाव शहरातील तहसिल कार्यालयाच्या प्रागणात 'आत्मदहन 'करणार आसल्याचा इशारा संबंधित प्रशासनाला दिलेला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी