उस्माननगर, माणिक भिसे। भारतीय स्वतंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवीनिमित्त हर, हर घर तिरंगा " कार्यक्रम नांदेड जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी उस्माननगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मुलांची व मुलींची शाळा आणि सम्राट अशोक प्राथमिक शाळा यांच्या वतीने गावातील प्रमुख मार्गाने प्रभात फेरी काढून भारत माता की जय, तिरंगी झेंड्याचा विजयी असो ,.. अशा घोषणा देत हातात झेंडा घेऊन रॅली काढण्यात आली.
नांदेड जिल्हा परिषदेच्या लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार तालुक्यातील गटशिक्षण विभाग यांच्या वतीने उस्माननगर येथील प्राथमिक शाळेत नुकतीच देशभक्तीपर समुह गीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते. सम्राट अशोक प्राथमिक शाळा, तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा (मुलांची मुलीची ) या शाळेतील विद्यार्थी , विद्यार्थीनी, सहशिक्षिक, अंगणवाडी सेविका, कर्मचारी, अधिकारी कर्मचान्यानी सहभाग घेतला होता.
त्यानंतर उस्माननगर येथील मुख्य रस्त्याने तिरंगा रॅली काढून 'हर घर तिरंगा लावण्यता यावा, असा संदेश देण्यात आला.' जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर , जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांच्या संकल्पनेतून , नांदेड जिल्ह्यात सर्व जिल्हा परिषद व खासगी शाळांमधून देशभक्तीपर गिताचे समूहगाण राबविण्यात यावे , अशा सुचना करण्यात आल्या होत्या.
या उपक्रमात उस्माननगर येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळा, तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा (कन्या व मुलांची) या शाळेच्या वतीने गावातील प्रमुख रस्त्याने विद्यार्थ्यांच्या हातात झेंडा देऊन प्रभात फेरी काढण्यात आली.परिसर वंदे मातरम् , भारत माता की जय, तिरगी झेंड्याचा विजयी असो या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने विविध शाळेमध्ये सामूहिक गाण्यानी परिसर देशभक्तमय झाला होता.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी , आणि 'हर घर तिरंगा या उपक्रमाची जनजागृती व्हावी, यासाठी समूहगान व रॅली उस्माननगर येथील मुख्य रस्त्याने तिरंगा रैली काढण्यात आली होती. उस्माननगर येथील सर्व शाळेने भरभरून प्रतिसाद दिला . सर्वानी योग्य नियोजन करून देशभक्तीपर कार्यक्रमासाठी सुदर अशी प्रभात फेरी काढून नागरिकांच्या मनामध्ये देशभक्ती निर्माण झाली आहे.शाळेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.