लोहा| लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष झाले की त्या भागातील लोकांना मूलभूत सुविधेसाठी रस्त्यावर उतरावे लागते..प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन करावे लागते. लोहा शहराच्या जवळ असलेल्या देऊळगाव ग्रामस्थांवर अशी वेळ आली. एकीकडे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला त्याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी राष्ट्र ध्वजारोहण झाल्या नंतर अख्ख गाव बेरळी रस्त्यावर चिखलात अन खड्ड्यात बसलं...रस्ता द्या ..हो रस्ता ..अशी ग्रामस्थांची आर्त निद्रिस्त प्रशासनाला जागे करील काय (?)
देऊळगाव - बेरळी हा तीन किमी अंतराचा रस्ता पण गेल्या अनेक वर्षा पासून तो नादुरुस्त आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे तालुक्याच्या ठिकाणी आणि शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी येथील ग्रामस्थांना पावसाळ्यात कसरत करावी लागते.या भागाचे लोकप्रतिनिधी याना वारंवार विनंती केली तसेच संबधित प्रशासनाला अर्ज विनंती केली पण यंत्रणा "ठस्स से मस्स" काही केल्या हालेना..
संपूर्ण देशासह राज्यात जिल्ह्यात अन तालुक्यात स्वातंत्र्य दिना उत्साह ओसंडून वाहत होता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात होता..हर घर झेंडा लावला जात होता त्याचवेळी देऊळगावातील तीनशेहून अधिक ग्रामस्थ गावचा मुख्य राष्ट्र ध्वजारोहण करून गावाच्या रस्त्यासाठी एकवटले .
देऊळगाव येथील तिनशेहून अधिक ग्रामस्थ .हातात तिरंगा ..भारत माता की जय...असा घोषणा सोबतच आम्हाला रस्ता द्या ..रस्ता अशी आर्त टाहो..होता पण यंत्रणा बधिर झालेली गेल्या वीस वर्षांपासून अनेक वेळा निवेदन दिले मागणी केली परंतु दखल घेतली नाही अमृत महोत्सव दिनी तरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी म्हणून गावकऱ्यांनी 15 ऑगस्ट रोजी रस्त्यावरील खड्डयात हातात तिरंगा घेऊन अनोख्या आंदोलनातुन प्रशासनाचे लक्ष वेधले.
आंदोलनाचे नेतृत्व सरपंच मारोती सोनवळे यांनी केले केले. माजी सरपंच रघुनाथ सोनवळे चेअरमन रमेश सोनवळे माजी चेअरमन डी एस सोनवळे व्हाईस चेअरमन विलास राऊत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबुराव सोनवळ, प्रभाकर टाले पत्रकार शेख मुर्तुजा कामाजी बंडेवार रंगनाथ जोंधळे ज्ञानोबा सोनवळे सखाराम सोनवने सुनील जोंधळे बबलू शेख यासह अख्ख गाव यात सहभागी झाले होते.आता तरी रस्ता होईल काय हो ..या गावाला ..असा सवाल यानिमित्ताने पुन्हा उपस्थिती होतो आहे.