15 हजार विद्यार्थ्यांसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले राष्ट्रगीताचे उत्स्फूर्त गायन -NNL

नांदेड| स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामूहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमाला नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील श्री गुरू गोविंदसिंगजी  स्टेडियमवर यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  या कार्यक्रमाला  नांदेड येथील  सुमारे 15 हजार विद्यार्थी व अधिकारी कर्मचारी यात उत्स्फूर्त सहभागी झाले.

सकाळी नियोजना प्रमाणे अकरा वाजता राष्ट्रगीत गाण्यात आले. यावेळी महापौर जयश्री पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयाळे, अनुराधा ढालकरी, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, सविता बिरगे, , जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय तुकाबले, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, यांची उपस्थिती होती.

स्वातंत्र्यांच्या अमृतमहोसत्वानिमित्त विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहुन 75 अंक आकार साकार केले. तर 120 फुट लांबीचा तिरंग्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. एकूण 60 शाळांमधील 15 हजार विद्यार्थी या समूह राष्ट्रगीत गायनामध्ये सहभागी झाले होते. याप्रसंगी राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे 34 जवानांसह 2 हजार 972 अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.यावेळी किड्स किंग्डम शाळेच्या विद्यार्थ्यांनी बँड बासरी सह समूह राष्ट्रगीत गायन सादर केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार किरण अंबेकर, नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, प्रलोभ कुलकर्णी, संजय भालके, यांच्यासह तहसिलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी, तलाठी, कार्यालयीन कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी