लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष राजुभाऊ गायकवाड यांची मागणी
हिमायतनगर। हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील ग्रामपंचायत कार्यालयावर कार्यरत असलेले ग्रामसेवक पवन जाधव व सरपंच यांनी शासनाच्या निर्णयाची पायमल्ली करून सोमवार दिनांक.1/08/2022 रोजी अण्णा भाऊ साठे यांची जयंती जाणूनबुजून टाळाटाळ केली.
ग्रामपंचायत कार्यालयात जयंती न करता परस्पर ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेऊन अण्णा भाऊ साठे यांच्या बद्दल जनतेच्या असलेल्या धार्मिक भावना दुखावल्याने सरपंच व ग्रामसेवक यांचे विरुद्ध तात्काळ फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुका येथील कार्यकर्त्यांनी तहसीलदार हिमायतनगर यांना सादर केलेल्या निवेदनात केली, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
अण्णा भाऊ साठे यांची जयंती महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सरकारी कार्यालायामध्ये शासन निर्णयानुसार चांगल्या पद्धतीने साजरी करण्यात आली. परंतु शासन निर्णयाचे उल्लंघन करत मौजे बोरगडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक व सरपंच यांना रविवारी अण्णा भाऊ साठे यांची जयंती असल्याची माहिती असतांना सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक त्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयच उघडले नाही व जाणीवपूर्वक बाहेरगावी गेले. व शासन निर्णयाची पायमल्ली केली असल्याचा आरोप लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष राजुभाऊ किसनराव गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.या वेळी लहुजी शक्ती सेना कार्यकर्ते पांडुरंग गायकवाड.सामाजिक कार्यकर्ते डॉ.रविराज दुधकावडे,व यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.