मुखेड/नांदेड| विद्यार्थ्यांनी मोबाईल इंटरनेटचा वापर अभ्यासासाठी करावा. जिद्दीच्या बळावर व मेहनत करुन चांगल्या मोठ्या पदावर नोकरी करुन यश संपादन करावे असे प्रतिपादन देगलूरच्या उपविभागीय अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले.
मुखेड तालुक्यातील मौजे बामणी येथे शहीद सुधाकर शिंदे यांच्या प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्ताने श्रद्धाजंली अर्पण करण्याचा कार्यक्रम दि. 20 ऑगस्ट रोजी मौ. बामणी येथे पार पडला. या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुखेडचे आयटीबीपीचे कमांडर श्रवणकुमार, तहसीलदार काशिनाथ पाटील, मुक्रमाबाद पोलिस स्थानकाचे सपोनी संग्राम जाधव,पोलिस उपनिरीक्षक गजानन कांगणे, लोहा तहसिलचे तहसिलदार व्यंकटेश मुंढे, मंडळ अधिकारी मुंडे शाहिद सुधाकर शिंदे यांच्या पत्नी सुधा शिंदे, राजेंद्र शिंदे, ग्रामविकास अधिकारी सुनील पारडे यांची उपस्थिती होती.
शाहिद सुधाकर शिंदे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त परिसरातील गुणवंत विद्यार्थांचे व विद्यार्थीनिंचा सन्मानचित्र व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शहीद सुधाकर शिंदे यांच्या स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच माधवराव जाधव, शिवशंकर पाटील, शिवकुमार मुगदाळे, बालाजी पसरगे, पञकार अशोक लोणीकर, विनोद आपटे, शाकीर काझी, मुख्याध्यापक मोरे, यांच्यासह बामणी व मुक्रमाबाद परिसरातील अनेक विविध क्षेत्रातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी , पोलिस पाटील, चेअरमन विविध शाळेचे, सहशिक्षक, विद्यार्थीसह अनेक नागरिक उपस्थित होते.