हदगाव, शे चांदपाशा| स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित नागरिकांनी त्याच्या घरावर 13आँगष्ट ते 15 आँगष्टच्या दरम्यान दिवसराञ तिरंगा ध्वज फडकविता येणार आहे. नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा लावता यावा म्हणुन 'ध्वजसंहितेत बदल करण्यात आला आहे. माञ शासकीय कार्यालवर पुर्वीप्रमाणेच सुर्यादय ते सुर्यास्ताप्रमाणेच राष्ट्रीय ध्वज फडकविता येणार आहे. सोबत शहरातील तालुक्यातील सर्वशासकीय कार्यालयवर रोषणाई केली जाणार आहे अशी माहीती हदगाव तालुक्याचे तहसिलदार तथा दडांधिकारी जीवराज डापकर यांनी दिली.
या प्रसगी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या हस्ते झेंडा विक्रीचा शुभारंभ करण्यात आले. शहरातील व तालुक्यातील बचत गटातील महिलांनी हा उपक्रम सुरु केला आहे शहरात व तालुक्यात विक्री केद्र सुरु करण्यात आलेल आहे शहरातील व तालुक्यातील शाळा महाविद्यालये व तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना ही मोहीम राष्ट्रीय सण म्हणुन राबविण्याच्या सुचना दिल्या जाणार आहे. नगरपरिषदच्या स्तारावर या हर घर तिरंगा या मोहीमे करिता न.पा.चे व तहसिल कार्यालयचे कर्मचारी सक्रिय आहेत 'हर तिरंगा' उपक्रमला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहीती ही तहसिलदारा डापकर यांनी दिलेली आहे.
राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या मोहीमेद्वरे होणार आहे. या द्वरे जास्तीत जास्त घरावर तिरंगा फडकविला जाणे ही अभिमानस्पद बाब असेल असही तहसिलदार जीवराज डापकर यांनी सागितले. या प्रसगी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील तहसिलदार जीवराज डापकर न.पा.चे मुख्यधिकारी जाधव नायब तहसिलदार हाराळे अव्वल कारकून हाक्के आदी कर्मचारी नागरिक व पञकार उपस्थित होते.