आ.जवळगावकरानी संधी दिल्यास जनतेतून अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास तयार - गौतमचंद पिंचा -NNL

सार्वत्रिक निवडणुकीचा आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छूकांच्या गाठीभेटी वाढल्या  

हिमायतनगर, अनिल मादसवार| 
ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर हिमायतनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण सोडत करण्यात आली आहे. यानंतर अनेक इच्छूकांनी आपल्या सोयीचा वॉर्ड धरून निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी भेटीगाठील सुरुवात केली आहे. नगराध्यक्ष सुद्धा जनतेतून निवडून येणार असल्याने अनेक इच्छुक तयार असले तरी जनतेतून निवडून येऊन हिंदू समाजामधून नगराध्यक्ष होण्यासाठी येथील प्रसिद्ध व्यापारी गौतमचंद पिंचा यांनी तयारी दर्शविली आहे. यासाठी आमदार साहेबाना निरोप पाठविला असून, आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी संधी दिल्यास जनतेतून अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास मी तयार असल्याची माहिती गौतमचंद पिंचा यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.   

गेल्या अनेक दशकापासून हिमायतनगर शहराची एक वेगळी परंपरा आहे, लोकसंख्येनुसार पहिला अडीच वर्षासाठी हिंदू समाजाचा आणि दुसऱ्या अडीच वर्षासाठी मुस्लिम समाजाचा उमेदवार हा प्रमुख मोठ्या पदावर बसविला जातो. मागील निवडणुकीत काँग्रेस -१०, शिवसेना -४, राष्ट्रवादी काँग्रेस -२, अपक्ष -१ असं पक्षीय बालंबाल राहिले आहे. पंचवार्षिक निवडणुकीत सार्वधिक उमेदवार निवडून आलेल्या काँगेस पक्षाने हिंदूंचा नगराध्यक्ष पहिल्यांदा केला नसल्याने जनतेत नाराजी झाली. आणि त्यात पुढील अडीच वर्षाच्या नगराध्यक्ष निवडीच्या वेळी केवळ आश्वासन देऊनही पुन्हा मुस्लिम समाजालाच नगराध्यक्ष करण्याचा घाट केल्याने काँग्रेसमधील अनेकांनी बंडखोरी करून शिवसेनेला पाठिंबा देत हिंदू समाजाच्या व्यक्तीला नगरध्यक्षपदी बसविले होते. तेंव्हापासून येथे काँग्रेस पक्षाची पीछेहाट व्हायला सुरुवात झाली. पुन्हा सोसायटीच्या निवडणुकीतही काँग्रेसने प्रचाराची धुरा हिंदू समाजाच्या नेत्यावर सोडली नसल्याने सर्वात मोठी हिमायतनगर येथील विविध कार्यकारी सोसायटी काँग्रेस पक्षाला गमवावी लागली आहे. तीच परिस्थिती या नगरपंचायत निवडणुकीत पक्षावर येऊ नये म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या विचाराने उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या चाचपणीच्या कार्यशैलीवरून दिसते आहे.

एकूणच नगरपंचायत निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार अशी चर्चा होत असताना महाराष्ट्र पातळीवर राजकीय घडामोडी वेगाने घडल्या. आणि मागील महिन्याभरापूर्वी महाराष्ट्रात सत्ता बदल होऊन शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर पहिला प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून अखेर ओबीसी आरक्षण मिळवून दिले आहे. त्याचं बरोबर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार असल्याचा अध्यादेश शिंदे - फडणवीस सरकारने काढला आहे. त्यामुळे आता केवळ वॉर्डातील नगरसेवक म्हणून निवडून येणारा अध्यक्ष होणार नसून, त्या उमेदवारास जनतेतून सर्वाधिक मते घेऊन निवडून यावे लागणार आहे. तर तो उमेदवार नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान होणार आहे. 

त्यामुळे अनेकांनी नगराध्यक्ष होण्यासाठी कंबर कसली असून, आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत हिमायतनगर नगरपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना -राष्ट्रवादी युतीच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. यास कोणत्याही मोठ्या नेत्याने दुजोरा दिला नसला तरी शहरात शिवसेना- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खाजगीत बोलून दाखवीत आहेत. तर भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असून, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, बसपा, बरोबर काँग्रेस पक्ष सुद्धा स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. यात आणखी एक ट्विस्ट म्हणून नुकतेच बाबूराव कदम कोहळीकार यांनी देखील जिल्हा परिषद - पंचायत समितीसह नगरपंचायत, नगरपरिषद निवडणूक लढविणार असल्याचे नुकत्याच हदगाव तालुक्यातील निवड येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत जाहीर केले आहे. त्यामुळे नगरपंचायत आणि येणाऱ्या सर्व निवडणूक आता रंगतदार होणार आहेत. 

आता कोणत्या पक्षाची उमेदवारी कोणाला मिळेल हे सध्यातरी सांगणे कठीण असले तरी मागील काळात सत्येत असलेल्यानाही डोहाळे लागले असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. काँग्रेसकडून अनेक मातब्बर इच्छूक असताना आता आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी संधी दिल्यास मी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार आहे. अशी प्रतिक्रिया हिमायतनगर येथील प्रसिद्ध व्यापारी गौतमचंद पिंचा यांनी देऊन राजकारणात उडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये इच्छुक असलेल्याचा आशेवर पाणी फिरते कि काय..? अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष कोणाचे नाव जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी जाहीर करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जर जवळगावकरांनी गौतम पिंचा याना संधी नाही दिली तर ते बाबुराव कदम कोहळीकर गटाकडे जाऊन निवडणूक वाढवितात कि काय..? अशी चर्चा देखील राजकीय जाणकारातून वर्तविली जात आहे. मग शिवसेना कोणाला नगरध्यक्षपदासाठी निवडणार अशीही चर्चा शहरात सुरु आहे. एकूणच निवडणूक लागण्यास अजून वेळ असला तरी आरक्षणानंतर मात्र आगामी नगरपंचायत निवडणुकांच्या चर्चा चौकाचौकात होताना ऐकू येत आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी