पुलवजा बंधाऱ्याच्या कामाची ई निविदा निघाली असून लवकर कामाचा शुभारंभ-आ. श्यामसुंदर शिंदे
उस्माननगर,माणिक भिसे| कंधार तालुक्यातील मौजे कौठा येथील बहुचर्चीत असलेल्या मन्याड नदिवरील पुलवजा बंधारा बांधकामासाठी वारंवार पाठपुराव्यामुळे कामांची ई - निविदा निघाली असुन लवकरच बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती लोहा, कंधार विधानसभेचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आ.श्यामसुदंर शिंदे यानी दिली.
कंधार तालुक्यातील कौठा येथील व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्याची, गावाकऱ्यांची आणि महिलांची अनेक दिवसाची मागणी असलेला मन्याड नदिवरील पुलवजा बंधारा स्वातंत्र्याच्या ७० वर्षापासुन रखडला होता, अनेकानी आश्वासन दिल तर काहीनी कुठलीच मजूरी नसताना नारळ ही फोडले, आम्ही निवडनुकीत आश्वासन दिल ते पाळल,या कामाला जरी वेळ लागला असला तरी आता कौठा पुलवजा बंधाऱ्याच्या कामाची ई निविदा निघाली असून लवकरच या कामाची सुरुवात होणार असल्याचे आ. श्यामसुदंर शिंदे यानी सागितले.
या पुलवजा बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने या भागातील कौठा,राहाठी, वरवंट,जाकापुर वासियांची होणारी हेळसांड थाबणार आहे. कौठा येथील ६० टक्के जमिन हि नदीपाञा पलिकडे असल्याने पावसाळ्यात नदीला पुर येताच येथिल शेतकऱ्यांना नदीपलिकडे जाण्यासाठी जिव धोक्यात घालुन जावे लागत होते. पुढीलवर्षी शेतकऱ्यांना याच पुलावरुण जाणे येणे सुलभ होणार आहे, विकास कामासाठी कुणाकडे जायाची गरज नाही मी खंबीर आहे कामे सागा ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी माझी आहे.
आम्हाला मतदान कमी झाले म्हणुन मी विकास कामे थाबंवणारा नाही किंवा कुठल्याही विकास कामामध्ये भेदभाव करणारा नाही,की कुठले काम रद्द करणार नाही विकास कामाना प्राधान्य देवून हा भाग सुजलाम सफलाम झाल्या शिवाय स्वस्त बसणार नसल्याचे आ. शिंदे यानी सागितले, या पुलवजा बंधाऱ्याला मंजुरी व निधी मिळवण्यासाठी आमदार शामसुंदर शिंदे यांनी वेळोवेळी मंत्रालय स्तरावर पाठपुराव्यामुळे प्रयत्न करून यश मिळाले आहे.या बंधाऱ्याला मंजुरी व निधी उपलब्ध करून घेतलेला होता. आता या बंधाऱ्याच्या कामाची निविदा निघाल्यामुळे कौठा व तालुक्यातील जनतेतून आ.श्यामसुंदर शिंदे यांचे कार्याचे अभिनंदन व कौतुक होत आहे.