नांदेड| बापूसाहेब देशमुख गोरठेकर व माझे अतिशय जिव्हाळ्याचे ऋणानुबंधांचे संबंध होते. ते नातेवाईक होते. जिल्ह्यातील शब्द पाळणारे घराणे म्हणून गोरठेकर घराण्याकडे पाहिले जाते. बाबासाहेब देशमुख असतील किंवा बापूसाहेब देशमुख असतील यांनी दिलेला शब्द हा प्रमाण मानल्या जात. शब्दास प्रचंड किंमत देणार हे घराणं जिल्ह्यामध्ये हा असा एकमेव नेता की जो दिलेला शब्द पाळत होता.
बापूसाहेबांच्या जाण्याने माझ्या वैयक्तिक जीवनात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या निधनामुळे नांदेड जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाड्यातील एक जाणता, जाणकार आणि समाजाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. एक मार्गदर्शक आणि धुरंदर राजकारणी आपण गमावला आहोत आशा शोक भावना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली.
