नांदेड| पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत गळा आवळून खून करणाऱ्या आरोपी पतीस जन्मठेप व १० हजार दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी ठोठावली आहे.
किनवट तालुक्यातील जशोदा तांडा(थारा) येथील मोतीराम तोडसाम हा चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी लक्ष्मीबाई हीस मारहाण करत असे. १० ऑक्टोबर २०१३ रोजी रात्री मोतीरामनेच पत्नी लक्ष्मीबाईचा झोपेत गळा दाबून खून करून मृतदेह फेकून दिला.
