उस्माननगर| परिसरात जयंती,उत्सव म्हटलं की , मोठं मोठे कार्यक्रम, रॅली, मिरवणूक असे भव्य कार्यक्रम केले जातात. पण लोहा तालुक्यातील आंबेसांगवी गावामध्ये'अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षी जयंती मंडळाच्या वतीने अनोखे स्तुत्य उपक्रम राबविण्यात येतात,आंबेसांगवी येथे 22 ऑगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन, शालेय विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य'वाटप असे'स्तुत्य उपक्रम या जयंतीदिनी राबविण्यात आले.
मोफत नेत्र तपासणी शिबिराला 170 गरजू रुग्णांनी लाभ घेतला,तर 150 शालेय विद्यार्थ्याना शारदादेवी संस्थानाच्या वतीने शैक्षणिक साहित्य'वाटप करण्यात आले. कॅप्टन संजय कदम यांच्या हस्ते क्रांती ध्वजाच ध्वजारोहण करण्यात आले ,तर कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून पोलीस सहाय्यक निरीक्षक विशाल भोसले, यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राहुल भैया हंबर्डे तर मोफत नेत्र तपासणी शिबीराचे उद्धघाटन विद्यमान पंचायत समिती सदस्य श्रीनिवास मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून'गजानन पातेवार जिल्हा अभियान व्यवस्थापक, द्वारकादास राठोड जिल्हा व्यवस्थापक,शारदादेवी संस्थानाच्या अध्यक्षा मंजुषा चौहाण, प्रगती निलपत्रेवार-शा.दवाखाना विष्णूपुरी सर्जरी वार्ड प्रमुख,आरोग्य साह्यक मनपा नांदेड बालाजी निलपत्रेवार,कांता ताटे तालुका अभियान व्यवस्थापक लोहा, संपादक संजयकुमार गायकवाड,लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघमारे,आकाशवाणीचे प्रसंगीक निवेदक आनंद गोडबोले,लालसेना जिल्हाध्यक्ष हनुमंत कंधारे, राहुल खिल्लारे,शिवहार गालफाडे,आंबेसांगवी नगरीच्या सरपंच सौ.धोंडूबाई डुबे,उपसरपंच प्रतिनिधी-विक्रम कदम,ग्रामपंचायत सदस्य गणपत पा.कदम,रावसाहेब पा.उमरेकर सदस्य बालाजी पांचाळ, रमेशजी वाघमारे,मा.उपसरपंच भानुदास वाघमारे,गंगाधर पा.कदम,राम पा.सावंत,माधव पा.सावंत, एस.पी कदम,साहेबराव सूर्यवंशी,आंबेसांगवी गावातील सर्व जाती-धर्माचे लोकांची अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीला उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश डुबे,दत्ता डुबे,मरीबा डुबे,गंगाधर डुबे,दयानंद डुबे,संजय डुबे,तिरुपती डूबे,राजकुमार डुबे, पद्माकर डुबे,मिलिंद डुबे,ज्ञानेश्वर डुबे,परमेश्वर डुबे,बालाजी डुबे यांनी परिश्रम घेतले.तर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवराचे आभार संपादक स्वप्निल गव्हाणे यांनी मानले!
