नांदेड| आदिवासी कोळी महादेव- मल्हार- टोकरा सकल आदिवासी कोळी समाजाची नांदेड जिल्हास्तरीय बैठक दि. २१ ऑगस्ट रविवार रोजी दुपारी ठिक १ वाजता कॉ. दत्ता देशमुख विज कामगार भवन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीकसिटी वर्क्स फेडरेशन कार्यालय अण्णाभाऊ साठे चौक, नांदेड येथे मोठ्या संख्येने पार पडली.
बैठकीचे मुख्य कारण अडचण म्हणजे आदिवासी कोळी महादेव समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात येणार्या अडीअडचणीबाबत समाजाचे जेष्ठ विचारवंत गाढे संशोधक अभ्यासक मा.श्री. प्रा. डॉ. शरणकुमार खानापूरे, कोल्हापूर यांचे दोन दिवसीय मार्गदर्शनपर व्याख्यान (सेमीनार) नांदेड येथे घेण्यासाठी बैठकीमध्ये सांगोपांग विचारविनिमय करुन पुढच्या महिन्यात दोन दिवसीय मार्गदर्शनपर सेमीनार घेण्याचे ठरले.
सदरील बैठकीमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी आदिवासी कोळी समाजातील दानशूर राजकारणी, अधिकारी, कर्मचारी यांनी स्वइच्छेने पुढाकार घेऊन जो निधी खर्च लागेल तो देण्याची एकमुखाने संमती दर्शवली. सदरील कार्यक्रम हा दोन दिवसीय असून पहिल्या दिवशी सर्वांसाठी व्याख्यान (सेमीनार) ज्यात ऐतिहासिक, निजामकालीन, ब्रिटीशकालीन पुराव्यानिशी आपल्या आदिवासी कोळी महादेव जमातीचे पुरावे दाखवण्यात येतील व दुसर्या दिवशी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, सर्व तहसीलदार, एसडीएम यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेऊन त्यांना सर्व पुरावे दाखवण्यात येतील असे एकमताने ठरले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज नेते मा. नागनाथरावजी घिसेवाड हे होते तर विचारपीठावर मा.श्री. शंकरराव मनाळकर, मारोती पटाईत, गंगाधर कल्याणकर, नामदेव दारसेवाड, केशवराव कुकुलवाड, गंगाधर बंडेवाड, जगजीवन सुदेवाड, महिपती डोंबुलवाड, आनंदा रेजितवाड, किशनराव सोने, शिवाजी गलांडे, प्रल्हाद मद्देवाड, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वरील सर्व मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली. शेवटी अध्यक्षीय समारोप श्री. नागनाथरावजी घिसेवाड यांनी केले. ते आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना म्हणाले की, सर्व समाज बांधवांनी गट-तट विसरुन समाजातील सर्वात तळाच्या बांधवांना कसा लाभ होईल, याचा विचार करुन एकत्रित यावे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. ज्ञानेश्वर मरकंठे यांनी केले तर सुत्रसंचालन श्री राम मालेवाड, माधव रेड्डेवाड यांनी केले. यावेळी सर्व उपस्थितांचे आभार श्री. दादाराव कोठेवाड यांनी मानले. या बैठकीला रावसाहेब पल्लेवाड, माधव पुनवाड, ईश्वर बोईनवाड, विक्की गोपीवार, लक्ष्मण नागरवाड, गोविंद सुर्यवंशी, कल्याण मोळके, चंद्रभान जगताप, लक्ष्मण घोरपडे, गिरीश गलांडे, उत्तम रोडेवाड, उलगुलवाड, विश्वनाथ बोईनवाड, किरण गांगलेवाड, दिगंबर मोरे, ज्ञानेश्वर रोडेवाड, माधव कोन्केवाड, शिवशंकर यगलेवाड, बळीराम मुद्देवाड, निखील इटुबोने, किरण कार्लेवाड, विष्णु घोरपडे, गजानन सोमेवाड, राजू ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती.