गणेश मंडळांना वर्गणीसाठी परवाना घेण्याचे आवाहन -NNL


नांदेड|
गणेश चतुर्थीसाठी गणेश मंडळांना वर्गणी गोळा करण्याचा परवाना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्यावतीने 22 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत रविवार व शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत देण्यात येणार आहे. सर्व गणेश मंडळांनी परवानगी घेऊनच वर्गणी गोळा करावी, असे आवाहन नांदेडचे धर्मादाय उपआयुक्त किशोर मसने यांनी केले आहे. 

गणेश मंडळांना ही परवानगी ऑनलाईन / ऑफलाईन पद्धती देण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन परवाना मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे. 

परवान्यासाठी सर्व सभासदांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ई-मेल आयडी, दुरध्वनी क्रमांक, जागा मालकाची संमती, पोलीस स्टेशनचे नाहरकत प्रमाणपत्र, गणेश मंडळ स्थापनेबाबत ठराव, मागील वर्षी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून वर्गणी गोळा करण्यासाठी परवानगी घेतली असले तर गेल्या वर्षाचा अधिकृत लेखा परिक्षकामार्फत जमा खर्चाचा हिशोब या कागदपत्रांची आवश्यकता आहे, असेही आवाहन धर्मादाय उप आयुक्त, नांदेड विभाग, नांदेड यांनी केले आहे.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी