१५ वर्ष उलटून अर्धवट कामामुळे येथे अंत्यविधी करता येत नाही
हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा) ही मोठी ग्रामपंचायत असून, येथील लोकसंख्या जवळ पास ५ हजारच्या इतकी आहे. खडकी बा. गावात मागील १२ ते १५ वर्षी पूर्वी स्मशान भूमीची मंजुरी मिळून कामही करण्यात आले. परंतु स्मशान भूमीचे काम अर्धवट राहिल्यामुळे येथे आता पर्यंत कोणाचाही अंतविधी उरकला नाही. तसेच स्मशान भूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही आणि स्मशान भूमीचे एक शेड पूर्ण तर एक शेड अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथील नागराईक आपापल्या सोयीने अंत्यसंस्कार उरकले जात आहेत.
हिमायतनगर तालुक्यात दोन दिवसापूर्वी टेम्भूर्णी येथील स्मशान भूमीला रस्ता नसल्याने प्रेताची अवहेलना झाली. त्यानंतर तालुक्यातील विविध गावच्या बरोबर खडकी बाजार येथील स्मशान भूमीचा मुद्दा समोर आला आहे. येथील ग्रामपंचायत अखत्यारीत येणाऱ्या नागरिकांना स्मशानभूमी नसल्याने वेळ पडल्यावर शेतमंजूर, भूमिहीन, नागरिकांना स्मशान भूमी असून देखील जमेल त्या ठिकाणी अंतविधी करण्याची वेळ आली आहे. स्मशानभूमी साठी आलेला निधी संपला की काय..? असा प्रश्न अर्धवट काम रखडलेल्या स्मशान भूमीवरून दिसते आहे.
गावातील स्मशानभूमीचे काम आजघडीला अर्धवट स्थितीत असून, सदरील काम कधी होणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलंला आहे. एव्हडेच नाहीतर येथील स्मशान भूमीत झाडी झुडपी वाढली असून, एखाद्या जंगलप्रमाणे अवस्था झाली असल्याचे पाहावयास मिळते आहे. मागील 15 वर्षी पासून ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले. परंतु आता पर्यंत गावाच्या प्रथम नागरिक असलेले सरपंचानी गावाला आवश्यक असलेल्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. आता तरी गावकऱ्यांचा मूलभूत प्रश्न असलेल्या स्मशान भूमीचे काम पूर्णत्वाकडे नेऊन सर्वसामान्याना आवश्यक असलेल्या स्मशान भूमीच्या दुरुस्तीकडे याकडे लक्ष देतील काय? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
याबाबत येथील नागरिक सांगतात कि मानव जीवन जगताना ज्याप्रमाणे वीज, पाणी, अण्णा वस्त्र निवारा आवश्यक आहेत. त्याचा प्रमाणे मूलभूत गरज असलेल्या मानवाच्या देहान्तानंतर मृतदेहाचा अंत्यविधी करण्यासाठी गाव तिथे स्मशान भूमी असायला हवी. परंतु खडकी येथे स्मशानभूमी असून अडचण नसून खोळंब अशी परिस्थिती येथील गावकर्यांची झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या सोयीनुसार मयत व्यक्तीच्या अंत्यविधी करावा लागत असल्याने अनेकजण बोलून दाखवित आहेत.